IMPIMP

Narayan Rane | सत्तेचं दूध पाजलं म्हणणाऱ्यांनी सत्तेत खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार (व्हिडिओ)

by nagesh
Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील गटमेळाव्यात काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्यासह भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) हल्ला चढवला होता. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. सत्तेचं दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, असा हल्लाबोल नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. तसेच तुम्ही अजूनही सुटला नाही, ईडी (ED) तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात (Sushant Singh Case) तुरुंगात जाणार असा इशारा राणे यांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तेव्हा उद्धव ठाकरे 6 वर्षांचे होते

 

शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षाचे होते, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे, आता गटप्रमुखांची बैठक घेतात इथपर्यंत आले आहेत, असा चिमटा काढत अडीच वर्षात किती गटप्रमुखांना भेटले. अडीच वर्षात मंत्रालयात तीन तास बसले. अडीच वर्षात काय केलं? असा सवाल नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

 

 

शहांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही

 

तुरुंगात असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. उद्धव ठाकरे यांना अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला? अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, ते कुठेही जातील. उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शाह यांनी शिवसेनेला जमीन दाखवा असं म्हटलं होतं. त्यांना जमीनीवर या असं म्हणायचं होतं. त्यांना अमित शहांच्या वक्तव्याचा अर्थ समजला नाही. आता ते आस्मान दाखवण्याची भाषा करत आहेत. ते कोणाच्या जीवावर?

…तेव्हा ते राजकारणात सक्रिय झाले

 

उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा असल्याचे राणे यांनी सांगितले. शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सहा वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते राजकारणात सक्रिय झाले.
आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारली का ? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले.
शिवसेना घडायला, वाढवायला, सत्तेवर यायला शिवसैनिकांचा त्याग आहे, यामध्ये उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संबंध नाही. दूध पाजले म्हणता, मग सत्तेत असताना खोक्यांच्या रुपाने तूप कोणी खाल्लं? यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी याआधी ते सांगितलं होतं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेत आले

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती.
त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. ते 1999 मध्ये शिवसेनेत सक्रिय झाले.
मी मुख्यमंत्री झाले आणि त्यांना घरुन कोणीतरी सांगितलं की राणे मुख्यमंत्री झाले, तूही कार्यरत रहा,
मुख्यमंत्री होशील. म्हणून ते शिवसेनेत आले. तोपर्यंत ते शिवेनेत सक्रीय नव्हते, असं राणे यांनी सांगितलं.

 

https://fb.watch/fI3047Q5Fo/

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane answer uddhav thackeray over criticism of bjp amit shah

 

हे देखील वाचा :

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Gautam Adani Meets Uddhav Thackeray | गौतम आदानी-उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज

 

Related Posts