IMPIMP

Narayan Rane | नारायण राणे यांना ‘या’ विधानावरुन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात (Sindhudurg Court) सुनावणी सुरू आहे. शिवसेना आणि राणे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत कनकवली पोलिसांनी (Kankavali Police) ही नोटीस बजावली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिक संतोष परबला (Santosh Parab) मारहाण याबाबत आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. तसेच, मागील 3 दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. नितेश राणे नेमके कुठे आहेत? हे कुणाला देखील माहित नाही. त्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा आहे.

अशातच नुकतंच काल नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे यांना सवाल करण्यात आला होता.
नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असा प्रतिप्रश्न देखील नारायण राणे यांनी केला होता.
याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्याबाबत माहिती तर नाही ना, असा देखील होतो आहे.
या कारणावरुन नारायण राणे यांना नितेश राणे यांच्याबाबत विचारणा करत नोटीस बजावण्यात आल्याचे कळते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसैनिकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) करत आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल करण्यात आला होता.
त्यावेळी उत्तर देताना राणे भडकले. त्यावेळी ते म्हणाले, असा प्रश्न असतो? ते कुठे आहेत हे सांगायला काय मूर्ख माणूस समजलात का तुम्ही मला?
कुठे आहेत काय आहेत, जरी मला माहीत असेल तरी मी सांगणार नाही. का सांगावं? तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी केला होता.

 

Web Title :- Narayan Rane | nitesh rane case notice union minister narayan rane be present police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील तडीपार आरोपीची पोलिसांना बघून घेण्याची धमकी

Income Tax Return (ITR) | करदात्यांना दिलासा ! इनकम टॅक्स विभागाने दिली ‘गुड न्यूज’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांच्या थकीत DA एरियरवर लवकरच येऊ शकतो निर्णय, यांना मिळेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम?

 

Related Posts