IMPIMP

Income Tax Return (ITR) | करदात्यांना दिलासा ! इनकम टॅक्स विभागाने दिली ‘गुड न्यूज’

by nagesh
Income Tax Saving Tips | income tax saving tips on parents insurance and investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return (ITR) | ज्या करदात्यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे आयटीआर ई-व्हेरिफिकेशन केले नाही त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अशा करदात्यांना दिलासा देत आयकर विभागाने (Income Tax Department) ई-व्हेरिफिकेशन (IT e-Verification) ची अंतिम मुदत वाढवली आहे. अशा करदात्यांना 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इनकम टॅक्स विभागाकडून सूट देण्यात आली आहे. कायद्यानुसार, डिजिटल स्वाक्षरी शिवाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरलेले इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) 120 दिवसांच्या आत आधार OTP किंवा नेट-बँकिंग किंवा डीमॅट खात्याद्वारे पाठवलेले कोड, पूर्व-प्रमाणित बँक खाते आणि एटीएमच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. (Income Tax Return (ITR)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तसेच, इन्कम टॅक्स भरणारे आयटीआरची एक प्रत बेंगळुरूमधील सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) कार्यालयात पाठवून देखील व्हेरिफिकेशन करू शकता. व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास, रिटर्न भरले गेले नाही असे गृहीत धरले जाते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 28 डिसेंबर रोजी एका परिपत्रकात म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2020-21 साठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केलेले ITR वैध ITR-V साठी इन्कम टॅक्स विभागाकडे अद्याप बाकी आहेत. (Income Tax Return (ITR)

परिपत्रकात असे म्हटले आहे की, “चालू वर्ष 2020-21 (आर्थिक 2019-20) साठी सर्व ITR च्या संदर्भात,
जे करदात्यांच्या परवानगीने दिलेल्या वेळेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अपलोड केले होते आणि ज्यामुळे ITR-V फॉर्म अपूर्ण राहिला होता,
ITR-V ची रीतसर स्वाक्षरी केलेली प्रत्यक्ष प्रत CPC, बेंगळुरूला स्पीड पोस्टाद्वारे किंवा EVC/OTP मोडद्वारे पाठवून बोर्ड अशा
रिटर्नची व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी देते.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

” व्हेरिफिकेशन प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करावी,” असे CBDT ने म्हटले आहे.
अशा परिस्थितीत, ज्या करदात्यांना त्यांच्या आयटीआरच्या ई-व्हेरिफिकेशनच्या अडचणी होत्या,
त्यांना आता जास्त वेळ मिळाला आहे आणि ते त्यांच्या आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन सहज करू शकतात.

 

Web Title :- Income Tax Return (ITR) | banking loan it department relaxes time till feb 2022 for taxpayers to complete verification of fy 20 itrs

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या 18 महिन्यांच्या थकीत DA एरियरवर लवकरच येऊ शकतो निर्णय, यांना मिळेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम?

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान, विदर्भात वीज काेसळून तिघांचा मृत्यू

Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकाला ‘डायरेक्ट’ पैशांची मागणी

 

Related Posts