IMPIMP

Nashik Crime | धक्कादायक ! बापानं लावलं पोरीला धंद्याला, नराधमाला 10 वर्षांची सक्तमजुरी

by nagesh
Pune ATS | no evidence of terror link pune court gives bail to two who arrested by ats for allegedly recruiting for lashkar e taiba pune crime news

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – बापानेच पोटच्या मुलीचा देहविक्रीसाठी सौदा (Prostitution Deal) केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने नराधम
बापाला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली (Girl Father Sentenced) आहे. नाशिक (Nashik Crime) येथील पंचवटीतील पेठरोड (Peth
Road Panchavati) भागात राहणाऱ्या आरोपीने 14 वर्षांपूर्वी मुलीचा देहविक्रीच्या बाजारात सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलिसांनी
(Panchavati police) आरोपीविरोधात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court)
सोमवारी (दि.17) झालेल्या अंतिम सुनावणीत आरोपी बापाला 10 वर्षांची सक्तमजुरी व 1 हजाराचा दंड अशी शिक्षा (Nashik Crime) सुनावली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दत्तात्रय उर्फ दत्तू चव्हाण Dattatraya alias Dattu Chavan (वय-45 रा. फुलेनगर, पेठरोड, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचा पुण्यात (Pune) वेश्याव्यवसायासाठी सौदा केला होता. या गुन्ह्यात पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) दत्तू चव्हाण याने स्वत: फिर्यादी होऊन मुलीला देहविक्रीसाठी नेण्यात आल्याची फिर्याद दिली होती. पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनराज दायमा (Police Inspector Dhanraj Dayama) यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता पीडितेने दिलेल्या जबाबावरुन फिर्यादी आरोपी हाच म्होरक्या असल्याचे समोर आले. (Nashik Crime)

 

 

पोलीस निरीक्षक दायमा यांनी दत्तू चव्हाण याच्यावर भादंवि कलम 372 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये 21 मार्च 2007 रोजी गुन्हा दाखल करुन अटक केली. गुन्ह्याचा तपास करत सबळ परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आले. या खटल्याची सुनावणी 2008 मध्ये सुरु झाली.

 

 

जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी (Judge V.S. Kulkarni) यांनी साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार दायमा यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपी दत्तू चव्हाण याला दोषी धरले.
सरकारी पक्षाकडून ॲड. भानुप्रिया नितीन पेटकर (Adv. Bhanupriya Nitin Petkar) यांनी कामकाज पाहिले.
पीडिता अंतिम सुनावणीत साक्ष देण्यासाठी गैरहजर राहिली.
गुन्ह्यातील इतर दोन्ही संशयित महिलांविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nashik crime | deal for the prostitution of a girl father sentenced to 10 years

 

हे देखील वाचा :

Punjab Assembly Election 2022 | पंजाब मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; आम आदमी पार्टीकडून ‘या’ नावाची घोषणा

Nitish Bharadwaj- IAS Smita Gate | 12 वर्षांनंतर टीव्हीवरील ‘श्री कृष्ण’ नितीश भारद्वाज यांचं दुसरे लग्नही मोडलं, पत्नी स्मिता IAS अधिकारी

Pune Crime | भोसरी येथील गुळवेवस्तीमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

 

Related Posts