IMPIMP

Nashik Crime News | नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अंगावर वीज पडून वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
 Nashik Crime News | one farmer dies due to lightning in nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन- राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे (Rain in Maharashtra) अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. तसेच काही ठिकाणी (Nashik Crime News) मोठ्या प्रमाणात जीवितहानीदेखील झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik Crime News) अशीच एक घटना घडली आहे यामध्ये सुरगाणा तालुक्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सावळीराम निंबा भोये असे वीज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime News) सुरगाणा तालुक्यात असलेल्या सराड गावी रविवारी 19 मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. यावेळी सावळीराम भोये (Sawaliram Bhoye) हे घरातील कुणालाही न सांगता आपल्या शेतात गेले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात सुरगाणा तालुका परिसरात वादळी वारा आणि विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरु झाला. यामुळे सावळीराम भोये हे रानातील एका आंब्याच्या झाडाखाली थांबले असता त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

बराच वेळ झाल्याने सावळीराम भोये हे घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत. सावळीराम भोये यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत, सकाळी घरी परत येतील असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला. तरीदेखील ते घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शेतात शोध घेतला तेव्हा ते शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्डयात गवतात मृत (Death) अवस्थेमध्ये आढळून आले. यानंतर सुरगाणा पोलिसांना (Surgana Police) याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर नाईवाईकांनी सावळीराम भोये यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या दुर्दैवी घटनेमुळे सराड गावावर शोककळा पसरली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Nashik Crime News | one farmer dies due to lightning in nashik

 

हे देखील वाचा :

Pune PMC Budget | पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 24 मार्च रोजी; अंदाजपत्रक हे 8500 कोटी रुपयांच्या पुढे असण्याची शक्यता

India Book of Records | कौतुकास्पद ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या 7 वर्षीय मुलाच्या विक्रमाची नोंद

Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा

 

Related Posts