IMPIMP

Pune PMC Budget | पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 24 मार्च रोजी; अंदाजपत्रक हे 8500 कोटी रुपयांच्या पुढे असण्याची शक्यता

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Budget | 2023 – 24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक 24 मार्च रोजी सादर केले जाणार आहे.
पालिकेमध्ये सध्या प्रशासकराज असल्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक तथा महापालिका आयुक्तच हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. (Pune PMC
Budget)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

कसबा विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीच्या (Pune Kasba Bypoll Election) आचारसंहितेमुळे यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब झाला आहे. येत्या 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर 24 मार्चला प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. (Pune PMC Budget)

मागील वर्षी आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) यांनीच 2022 – 23 या वर्षीचे अंदाजपत्रक सादर केले होते. दरवेळेस फेब्रुवारी मध्ये होणारी महापालिका निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे गेल्याने विक्रम कुमार यांनीच मांडलेल्या अंदाजपत्रकची अंमलबजावणी झाली.

आगामी अंदाजपत्रक हे 8500 कोटी रुपयांच्या पुढे असेल अशी शक्यता आहे. नव्याने झालेल्या नोकरभरती मुळे भांडवली खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पीएमआरडी (PMRDA) कडून समाविष्ट गावातील बांधकाम परवानगीतील उत्पन्नाचा 75 टक्के वाटा महापालिकेला मिळणार आहे व राज्य शासनाकडून जीएसटी मध्ये 10 टक्के वाढ देखील मिळणार आहे. समाविष्ट गावातून मिळकत काराचे उत्पन्न वाढणार असल्याने उत्पन्नाच्या बाजू मध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

 

हे देखील वाचा :

India Book of Records | कौतुकास्पद ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या 7 वर्षीय मुलाच्या विक्रमाची नोंद

Ajit Pawar On Water Pollution In Dams Of Pune District | पुणे जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे प्रदुषण रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवा

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | सहा महिने झाले सरकारची नुसतीच घोषणा; खेळाडूंचा गौरव ही नाही आणि पुरस्काराची रक्कम सुध्दा नाही

 

Related Posts