IMPIMP

National Pension Scheme (NPS) | पत्नीच्या नावावर उघडा स्पेशल अकाऊंट, केवळ रू. 5000 ची गुंतवणूक ! मिळतील रू. 1,11,98,471; दरमहिना रू. 44,793 चा पेन्शनचा सुद्धा लाभ

by nagesh
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNational Pension Scheme (NPS) | जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची पत्नी गृहिणी असेल तर नक्कीच तुम्ही तिच्या भविष्यासाठी विचार करत असाल. भविष्यात तुमच्या पत्नीने पैशासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. (National Pension Scheme (NPS))

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

यासाठी पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम New Pension System (NPS) खाते उघडू शकता. एनपीएस खाते पत्नीला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच तिला दरमहा पेन्शनच्या (Pension) स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. एनपीएस खात्यात (NPS Account) पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. यामुळे, वयाच्या 60 नंतर तुमची पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही.

 

उघडा एनपीएस खाते
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये एनपीएस खाते उघडू शकता. एनपीएस खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनपीएस खाते चालू ठेवा. National Pension Scheme (NPS)

 

रू. 5000 मासिक गुंतवणुकीतून होतील रू. 1.14 कोटी
उदाहरणार्थ, तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवता. जर तिला वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के रिटर्न मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून तिला सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय तिला दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. ही पेन्शन तिला आयुष्यभर मिळत राहील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किती मिळेल एकरकमी रक्कम आणि किती मिळेल पेन्शन

वय –  30 वर्षे

गुंतवणुकीचा एकूण कालावधी –  30 वर्षे

मासिक योगदान –  5,000 रु

गुंतवणुकीवर अंदाजे रिटर्न – 10 टक्के

 

एकूण पेन्शन फंड –

1,11,98,471 रुपये मॅच्युरिटीवर काढता येतील.

44,79,388 एन्युटी योजना खरेदी करण्यासाठी रक्कम.

67,19,083 रु. अंदाजे एन्युटी रेट 8%

मासिक पेन्शन 44,793 रु.

 

फंड मॅनेजर करतात अकाऊंट मॅनेजमेंट
एनपीएस ही केंद्र सरकार (central government) ची सामाजिक सुरक्षा योजना आहे. तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे प्रोफेशनल फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केले जातात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर यांना ही जबाबदारी देते. अशा स्थितीत तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र, या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर रिटर्न मिळण्याची खात्री नाही. फायनान्शियल प्लानर्सच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.

 

Web Title :- National Pension Scheme (NPS) | national pension scheme benefit open nps account in the name of wife and get rs 11198471 on maturity 44793 on pension

 

हे देखील वाचा :

Super Foods | हळदीपासून मशरूमपर्यंत, कॅन्सरसोबत लढू शकतात ‘हे’ सुपरफूड, जाणून घ्या

Health Tips | आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते साखर, गोड चहासाठी मिसळा ‘हे’ 4 पदार्थ, जाणून घ्या कोणते?

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

 

Related Posts