IMPIMP

Side Effects Of Grapes | जास्त द्राक्ष खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान, लठ्ठपणापासून किडनीपर्यंतच्या होऊ शकतात समस्या

by nagesh
Side Effects Of Grapes | side effects of grapes can cause weight gain to kidney problems pur

सरकारसत्ता ऑनलाइन – Side Effects Of Grapes | द्राक्षे सर्वांनाच आवडतात आणि विशेषतः हिवाळ्यात. द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals) आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आढळतात. यामुळेच द्राक्षे (Grapes) खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो, परंतु जर द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे अनेक दुष्परिणामही (Side Effects Of Grapes) होऊ शकतात. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू (Weight Gain) शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याच्यातील गोडव्यामुळे किडनीशी संबंधित समस्या (Kidney Problems) देखील उद्भवू शकतात. ‘स्टाइलक्रेज’च्या बातमीनुसार, द्राक्षे जास्त खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या (Stomach Problems) देखील उद्भवू शकतात, त्यामुळे द्राक्षे मर्यादित प्रमाणात खावीत. अधिक द्राक्षे खाणे तुमच्या शरीरासाठी कसे हानिकारक ठरू शकते ते जाणून घेवूयात…

 

जास्त द्राक्षे खाल्ल्याने होणार्‍या समस्या (Side Effects Of Grapes)

1. डायरिया (Diarrhoea)
जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने डायरिया म्हणजेच जुलाबाचा धोका वाढतो. त्याचबरोबर द्राक्षांमध्ये सिंपल शुगर (Simple Sugar) असल्याने सुद्धा जुलाब होऊ शकतात. त्यामुळे आधीच पोट खराब होत असेल तर द्राक्षे जास्त प्रमाणात खाऊ नयेत. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने डायरिया म्हणजेच अतिसाराची समस्या होऊ शकते.

 

2. किडनीच्या समस्या
जर एखाद्या व्यक्तीला किडनीचा जुनाट आजार किंवा मधुमेह (Diabetes) असेल तर त्याने द्राक्षे खाऊ नयेत. जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने अनेक प्रकारच्या किडनी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) देखील वाढते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो आणि किडनी खराब (Kidney Damage) होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. वजन वाढण्याची समस्या (Problems With Weight Gain)
हिवाळ्यात वजन वाढण्याची समस्या सर्वात जास्त असते. अशा स्थितीत द्राक्षे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. द्राक्षे खाल्ल्याने कॅलरीज (Calories) वाढतात. द्राक्षांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. त्याच वेळी, प्रोटीन (Protein), फॅट (Fat), फायबर (Fiber), कॉपर (Copper) आणि व्हिटॅमिन-के ( Vitamin-K) आणि थायमिन (Thiamine) देखील द्राक्षांमध्ये असतात. यामुळे जास्त द्राक्षे खाल्ल्याने वजन वाढू शकते.

 

4. प्रेग्नंसीमध्ये होऊ शकते समस्या (Problems Occur in Pregnancy)
द्राक्षांमध्ये भरपूर पॉलिफेनॉल (Polyphenols) असते जे रेड वाईनमध्ये (Red Wine) देखील आढळते.
यामुळे पोटात वाढत असलेल्या बाळात स्वादुपिंडाच्या समस्या (Pancreatic Problems) दिसून येऊ शकतात.
त्यामुळे गरोदरपणात (Pregnancy) द्राक्षे सेवन करताना खूप काळजी घ्या.

 

5. अ‍ॅलर्जीची समस्या (Allergy Problems)
जर तुम्ही जास्त प्रमाणात द्राक्षे खात असाल तर त्यामुळे हात आणि पायांना अ‍ॅलर्जीची समस्या होऊ शकते.
द्राक्षांमध्ये लिक्विड प्रोटीन ट्रान्सफरेज (Lipid transfer protein) असते ज्यामुळे अ‍ॅलर्जी (Allergy) होते.
या प्रकारच्या अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज सुटणे (Itching), रॅशेज (Rashes) येणे आणि तोंडाला सूज येणे (Mouth Ulcer) यांचा समावेश होतो.
द्राक्षांमुळे अ‍ॅनाफिलेक्सिस (Anaphylaxis) देखील होऊ शकते, जे खूप धोकादायक ठरू शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Side Effects Of Grapes | side effects of grapes can cause weight gain to kidney problems pur

 

हे देखील वाचा :

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

High Court | ‘पत्नीने अपरात्री परपुरूषाला फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रुरपणा’ – हायकोर्ट

Sandalwood Oil | टेन्शन, अस्वस्थता आणि कॅन्सरपासून वाचवते ‘या’ विशेष लाकडाचे तेल, घरी कसा करावा वापर? हे जाणून घ्या

Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले ‘झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ तर कधी ‘दुधवाले’, 11 महिन्यानंतर 2 सराईत समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

 

Related Posts