IMPIMP

Navi Mumbai ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना महिला तहसीलदार मीनल दळवी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Navi Mumbai ACB Trap | alibag tahsildar minal meenal krishna dalavi and rakesh chavan detained by navi mumbai acb for 2 lakhs bribe raigad alibag crime news

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – अलिबाग तालुक्यातील एका जमीनीच्या अपीलावर सुनावणी सुरु असताना त्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी करुन दोन लाख रुपये लाच (Accepting Bribe) घेणं अलिबागच्या तहसीलदार (Alibag Tehsildar) मीनल कृष्णा दळवी Meenal Krishna Dalvi (वय 49) यांना महागात पडलं आहे. दोन लाख रुपये लाच घेताने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) सापळा रचून मीनल दळवी (Minal Dalvi) यांना ताब्यात घेतले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास अलिबाग नगरपालिका (Alibaug Municipality) इमारतीच्या समोर आर के इलेक्ट्रॉनिक शॉप येथे केली. (ACB Trap On Alibag Tehsildar Meenal Krishna Dalvi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवी मुंबई एसीबीच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) तहसीलदार मीनल कृष्णा दळवी आणि एजंट राकेश रमाकांत चव्हाण Agent Rakesh Ramakant Chavan (वय-49) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. मीनल दळवी यांनी तीन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती दोन लाख रुपये स्विकारण्याचे कबुल करुन लाचेची रक्कम एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे देण्यास सांगितली होती. याबाबत 27 वर्षाच्या व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 28 सप्टेंबर 2022 रोजी तक्रार केली होती.

 

तक्रारदार यांचे सासरे यांच्या नावावर जमिनीचा सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्यासाठी व अपील प्रकरणाचा (Appeal Case) निकाल तक्रारदार यांचे सासरे यांचे बाजूने देण्यासाठी आरोपी राकेश चव्हाण याने स्वतःसाठी व तहसीलदार मीनल दळवी यांच्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी तक्रार केल्यांतर नवी मुंबई एसीबीच्या पथकाने 29 सप्टेंबर 2022 रोजी पडताळणी केली असता मीनल दळवी यांनी 3 लाखाची लाच मागून तडजोडी अंती 2 लाख घेण्याचे मान्य केले.

 

शुक्रवारी सायंकाळी अलिबाग नगरपालिका इमारतीच्या समोर असलेल्या आर के इलेक्ट्रॉनिक शॉप येथे सापळा
रचण्यात आला. एजंट राकेश चव्हाण याला तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ
पकडण्यात आले. त्यानंतर तहसीलदार मीनल दळवी यांना ताब्यात घेण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar),
नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख (DySP Jyoti Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे (Police Inspector Shivraj Bendre), पोलीस हवालदार जाधव, पवार,
चालक गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर, नाईक, आयरे, महिला पोलीस नाईक सावंत, विश्वासराव, चव्हाण, माने यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Navi Mumbai ACB Trap | alibag tahsildar minal meenal krishna dalavi and rakesh chavan detained by navi mumbai acb for 2 lakhs bribe raigad alibag crime news

 

हे देखील वाचा :

Girish Mahajan | गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा; म्हणाले “त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर…”

Pune Crime | करणी केल्याच्या संशयावरुन भावजयीचा खून, वडगाव शेरीतील घटना, दीराला अटक

Pune PMC News | केंद्र शासनाशी संबधित मे.इंजिनिअर्स इंडिया लि. तर्फे महापालिकेच्या विकास कामांचे थर्ड पार्टी क्वालिटी ऑडीट होणार

Maharashtra Winter Session 2022 | संसदेचे आगामी हिवाळी अधिवेशन रंगणार; विरोधक करणार ईडीच्या चौकशीची मागणी

 

Related Posts