IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘या भानगडीत न पडता दत्त उपासना करावी’; नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांचा शरद पवारांना टोला

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | nashik mahant aniket maharaj shashtri on sharad pawar over maharashtra karnatak border issuse

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन   कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला
आहे. त्यात काल (६ डिसेंबर) ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’ने महाराष्ट्र नोंदणीच्या ट्रकची बेळगावात-हिगेबागवाडी येथील टोल नाक्यावर तोडफोड
केली. या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला ४८ तासांचा इशारा दिला
होता. आता शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी त्यांना सल्ला दिला आहे. शरद पवारांनी (NCP Chief Sharad
Pawar) या भानगडीत न पडता दत्त उपासना करावी, असे अनिकेत शास्त्री महाराज म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंगळवारी पत्रकार परिषदेत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला चेतावणीही दिली. त्यावेळी पवार म्हणाले, “येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे.”

 

यावर आपली भूमिका मांडत अनिकेत शास्त्री म्हणाले, “चाळीस वर्षांपासून शरद पवारांनी वेगवेगळी मंत्रिपदं भूषवली आहेत. तरीही, आतापर्यंत पवारांनी (कर्नाटक महाराष्ट्र) सीमावाद मिटवला नाही. त्यात ४८ तासांची मुदत देऊन पुन्हा महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळवण्याचा प्रयत्न पवार करत आहेत. आज दत्त जयंती आहे. त्यामुळे लाखो भाविक कर्नाटकातील गाणगापूरला जातात. तिथे काय दुर्घटना घडली, तर संपूर्ण जबाबदारी शरद पवार यांची असेल.”

 

त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. “कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्न चर्चा करून सुटणार आहे.
त्यामुळे शरद पवारांनी आज दत्त उपासना करावी. तसेच, या भानगडीत न पडता ४८ तासांचा अल्टिमेटम देण्याची वादग्रस्त विधाने पवारांनी करू नयेत.
महाराष्ट्र-कर्नाटक आणि देशाची शांतता भंग पावू नये, अशी आशा व्यक्त करतो,” असे अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद सुरू झाल्यापासून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उठवत अनेकांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढविला आहे.
सरकारमधील मंत्री आणि आमदार सोडता कोणीही सरकारच्या बाजूने बोलताना दिसत नाही.
त्यामुळे नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी केलेले सदर वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | nashik mahant aniket maharaj shashtri on sharad pawar over maharashtra karnatak border issuse

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | ‘साई रिसॉर्टची चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा’ – किरीट सोमय्या

Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना

RBI Monetary Policy | भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे पतधोरण जाहीर; महागाई कमी करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

 

Related Posts