IMPIMP

किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना एक कॉल आणि जळगावात सत्तापालट !

by pranjalishirish
Eknath Khadse | eknath khadse says we should work very carefully for vidhan parishad after the rajya sabha defeat

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करत भाजपच्या गडाला खिंडार पाडून जळगावच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी किंगमेकरची भूमिका पार पाडली आहे.

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रिपद?

जळगाव महापालिकेमध्ये सत्तांत्तराचा डाव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे  Eknath Khadse यांच्या एका फोन कॉलमुळे घडला. ८ दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी जळगावमधील विकास कामाच्या निमित्तने उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यामध्ये एकनाथ खडसे यांनी जळगावमधील विकास कामांकडे आपण लक्ष द्यावे अशी विनंती केली. या चर्चेच्या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जळगावमध्ये महापालिकाच्या निवडणुकीला किती अवधी आहे अशी विचारणा केली यावर निवडणूक होण्यास अडीच वर्षांचा अवधी आहे, पण महापौरपदाची निवडणूक १८ मार्च रोजी आहे. तसेच आपल्या संपर्कात भाजपजे २२ नगरसेवक आहे, अशी माहिती एकनाथ खडसेंकडून देण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा महापौर असावा अशी इच्छासुद्धा सांगितली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना एकनाथ खडसे यांच्याशी बोलून पुढील रणनीती ठरवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरच बोलणे झाले यानंतर सेनेकडून एकनाथ शिंदे मदतीसाठी पुढे आले.

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

त्यानंतर एकनाथ खडसे Eknath Khadse  यांनी जळगावात तातडीने सूत्र फिरवत भाजपच्या नाराज नगरसेवकांना आपल्या निवास्थानी बोलावून घेतले. त्यामध्ये सुनिल खडके आणि त्यांचे समर्थक १० ते १२ नगरसेवकासह मुक्ताईनगरमधील खडसे यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. तिकडे त्यांनी सविस्तर चर्चा करून महापालिका ताब्यात घेण्याची रणनीती आखली. त्यानंतर त्या सगळ्या नाराज नगरसेवकांनी एकनाथ खडसे यांना होकार दिला. त्यानंतर जळगाव महापालिकेत सत्तांतर करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आणि नाराज नगरसेवकांची संख्या १२ वरून २२ वर जाऊन पोहोचली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुनिल महाजन सुद्धा खडसेंच्या भेटीला आले. यावेळी त्यांनी आपली पत्नी जयश्री महाजन यांना महापौरपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी सेनेच्या १५ आणि एमआयएमच्या ३ नगरसेवकांचा पाठिंबा आहे, असे सांगितले.

Sachin Vaze Case : खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत प्रश्न, म्हणाले – ‘सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?’

यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत या नेत्यांशी चर्चा झाली आणि महापौर पदासाठी जयश्री सुनिल महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर गळाला लागलेल्या नगरसेवकांची व्यवस्था कुठे करायची असा प्रश्न निर्माण झाल्यावर गुलाबराव पाटील यांनी तातडीने सूत्र फिरवत सगळ्या सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्याचे ठरवण्यात आले. यानंतर तातडीने सर्व नगरसेवकांना मुंबईला रवाना करण्यात आले. १६ तारखेला हे नगरसेवक ठाण्यात दाखल होताच आणखी काही भाजपच्या आणखी काही नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ४५ वर पोहोचली. शेवटी ठरल्याप्रमाणे सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. एकासुद्धा नगरसेवकाचे मत इकडचे तिकडे झाले नाही आणि शिवसेनेने अगदी सहजपणे भाजपच्या ताब्यात असणारी महापालिका आपल्या ताब्यात घेतली.

Also Read :

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts