IMPIMP

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

by nagesh
NDA Cadet Dies in Pune | Army court orders probe into NDA student deaths in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NDA Cadet Dies in Pune | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शनिवारी सकाळी दैनंदिन प्रशिक्षणादरम्यान एका परदेशी विद्यार्थ्यांचा मृत्यू (NDA Cadet Dies in Pune) झाला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मालदीव दूतावासाला (maldives embassy) कळवण्यात आली असून लष्कराच्या न्यायालयाकडून (Army Court) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior Police InspectorSunil Jaitapurkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मद सुलतान इब्राहिम Muhammad Sultan Ibrahim (वय २१, मूळ रा. मालदीव) हा एनडीएच्या 145 व्या अभ्यासक्रमासाठी आलेला विद्यार्थी होता. एनडीएत 12 मार्च 2021 पासून तो प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. सध्या त्याचा अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होता. शनिवारी सकाळी एनडीएमधील प्रशिक्षणाचा भाग असलेल्या एका उपक्रमात नेहमीप्रमाणे इब्राहिम सहभागी झाला होता. त्यावेळी तो अचानक जागेवरच कोसळला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराच्या न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. तर याप्रकरणी मालदीवच्या दूतावासाला ही खबर देण्यात आली आहे. या घटनेचा अहवाल पोलिसांना पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मालदीव दूतावासाशी चर्चा करून इब्राहिमचा मृतदेह लष्करी सन्मानासह मालदीवला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत (Pune Crime)आली आहे.

 

Web Title :- NDA Cadet Dies in Pune | Army court orders probe into NDA student deaths in pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घटस्फोटीत पती आणि प्रियकराच्या त्रासाने महिलेने केली गळफास लावून आत्महत्या; पुण्याच्या येरवडयातील घटना

Shivsena MP Sanjay Raut | दिल्लीच्या प्रतिष्ठित भागात राहतो, PM मोदी माझ्या घराच्या समोर राहतात – संजय राऊत

Maruti Alto 800 झीरो डाऊन पेमेंटवर 90 हजारात खरेदी करा, कंपनी देईल वॉरंटीसह मनीबॅक गॅरंटी

 

Related Posts