IMPIMP

New Portal Of Modi Government | मोदी सरकार आणत आहे नवीन पोर्टल ! PM आवास, उज्जवलासह 15 योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकता

by nagesh
New Portal Of Modi Government | modi government is bringing new portal will be able to take advantage of 15 schemes together with PM Awas Yojana and CLCSS

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNew Portal Of Modi Government | मोदी सरकार (Modi Government) सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या उद्देशाने विविध मंत्रालये आणि विभागांमार्फत चालवल्या जाणार्‍या विविध योजनांसाठी ’कॉमन पोर्टल’ (Common Portal) आणणार आहे. असे पोर्टल सुरू करण्याच्या प्रस्तावावर सरकार काम करत आहे. सूत्रांनी सांगितले की, मोदी सरकारच्या मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनाअंतर्गत विविध योजनांसाठी नवीन पोर्टलमध्ये कर्ज – आधारित 15 सरकारी योजनांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

योजनांचा होणार हळूहळू विस्तार
कॉमन पोर्टलवरील योजनांचा हळूहळू सुसंगत विस्तार केला जाईल, कारण काही केंद्र प्रायोजित योजनांमध्ये अनेक एजन्सींचा सहभाग आहे. उदाहरणार्थ, प्रधान मंत्री आवास योजना (PM Awas Yojana) आणि क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम Credit Linked Capital Subsidy Scheme (CLCSS) सारख्या योजना विविध मंत्रालयांद्वारे संचालित केल्या जात आहेत. (New Portal Of Modi Government)

हे लक्षात घेऊन, या योजना प्रस्तावित पोर्टलमध्ये एकाच व्यासपीठावर आणल्या जातील, जेणेकरून लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल.

 

पोर्टलची चाचणी सुरू
सूत्रांनी सांगितले की, याची प्रायोगिक चाचणी केली जात असून हे पोर्टल सुरू करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार केला जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर बँका ही चाचणी घेत आहेत. सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारे आणि इतर संस्था देखील या व्यासपीठावर त्यांच्या योजनांचा समावेश करण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- New Portal Of Modi Government | modi government is bringing new portal will be able to take advantage of 15 schemes together with PM Awas Yojana and CLCSS

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलींचा बलात्कार करुन त्यांना केले गर्भवती; पुण्यात एका दिवशी दोन घटनांमध्ये दोन गुन्हे दाखल

Pooja Bedi Bold Photos | समुद्र किनारी पोहचताच 51 वर्षाची अभिनेत्री विसरली स्वत:च वय, सौंदर्यामध्ये आपल्या मुलीला पाडलं मागे

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना ! 27 वर्षीय युवकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Eknath Shinde-Samrudhi Highway | जय महाराष्ट्र ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी चालवली 137 किमी वेगाने इलेक्ट्रिक कार; ट्विट करत म्हणाले… (Video)

 

Related Posts