IMPIMP

New Labour Code | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून मिळणार 300 सुट्ट्या..! मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याची शक्यता

by nagesh
PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार (Modi Government) या वर्षापासून कामगार कायद्यातील (Labour Law) सुधारणा अर्थात नवीन लेबर कोड (New Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. नवीन लेबर लागू (New Labour Code) करण्यास उशीर होत असल्याने केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Union Ministry of Labour and Employment) वेगाने हालचाली सुरु केल्या आहे. हे मंत्रालय 2022 मध्येच नवा लेबर कोड (Four Labour Codes in 2022) लागू करण्याचा विचार करत आहे. जर हा लेबर कोड लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अर्जित रजेची (Earned Leave) संख्या 300 होईल. मोदी सरकारने याची अंमलबजावणी केली तर अर्जित रजा 240 वरुन 300 पर्यंत वाढू शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लेबर कोडच्या नियमांमध्ये (Labour Code Rules) बदल करण्यासंदर्भात कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधीमध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या (Annual Leave), पेन्शन (Pension), पीएफ (PF), टेक होम सॅलरी (Take Home Salary), रिटायरमेंट (Retirement) आदींबाबत चर्चा झाली. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा 240 वरुन 300 पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.

 

 

प्रत्येक राज्याला सोबत घेण्याचा प्रयत्न
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, नवीन लेबर कोड (New Labour Code) लागू करण्यापूर्वी मंत्रालय प्रत्येक राज्याला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आम्ही सर्व राज्यांशी सातत्याने बोलत आहोत. बहुतेक सर्वजण तयार आहेत. ते नवीन मसुदा नियम (New Draft Rules) बनवत आहेत.
काही राज्य यावर विचार करत आहेत. नवीन लेबर कोड केव्हा लागू होईल, याची कोणतीही अंतिम मुदत देणं अवघड आहे.
मात्र 2022 पर्यंत नवीन चार लेबर कोड लागू होतील अशी अपेक्षा आहे.

 

यामुळे झाला उशीर
भारतातील 29 केंद्रीय कामगार कायदे (Central Labour Laws) 4 कोडमध्ये विभागलेले आहेत.
कोडच्या नियमांमध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध, व्यवसाय सुरक्षा आणि आरोग्य व कामाची परिस्थिती आदींचा समावेश आहे.
आतापर्यंत 13 राज्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
हे चार लेबर कोड संसदेने संमत केले, मात्र केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारांनाही हे कोड, नियम अधिसूचित करणं गरजेचं आहे.
त्यानंतर हे नियम राज्यांना लागू होतील. केंद्राला नव्या लेबर कोडची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून लागू करायची होती.
मात्र राज्यांची तयारी पूर्ण न झाल्याने ही अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली.

 

 

Web Title :- News Labour Coad | modi government central government employees will get 300 holidays from april 1 modi government can implement new rules coad

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | उरूळी देवाची व फुरसुंगी येथील 650 हेक्टरवरील 3 टी. पी. स्किमचा प्रारुप आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार; प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे

Congress Prathamesh Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रथमेश आबनावे; महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे निवडीबद्दल जाहीर सत्कार

Congress Saurabh Amarale | सौरभ अमराळे पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी

 

Related Posts