IMPIMP

Nirmal Mukherjee Passed Away | प्रसिद्ध वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे निधन

by nagesh
Nirmal Mukherjee Passed Away | chikmotyachi maal fame popular instrumentalist and composer nirmal mukherjee has passed away

सरकारसत्ता ऑनलाईन  – प्रसिद्ध वाद्यवादक आणि संगीतकार निर्मल मुखर्जी (Nirmal Mukherjee Passed Away) यांचे बुधवारी पहाटे हिरानंदिनी रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मंगळवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि उपचारांदरम्यान त्यांचे निधन (Nirmal Mukherjee Passed Away) झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. निर्मल यांच्या पार्थिवावर दुपारी चांदिवली-पवई येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी सहायक म्हणून संगीतकार राजेश रोशन यांच्याकडे सुरुवात केली. त्यांचे वडील एक प्रसिद्ध सिने निर्माता होते. दादरमध्ये त्यांचा बसंती म्युझिक हॉल होता. ज्यामध्ये अनेक संगीतकार-वादक रेकॉर्डिंगपूर्वी सरावासाठी तिथे येत असत. याच कालावधीत निर्मल यांच्यावर संगीताचा प्रभाव पडला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ते म्युझिक असोसिएशनचे सदस्य बनले होते. त्यांनी दहाव्या वर्षी हजरा सिंग यांच्या टीमसोबत वादनाला सुरुवात केली होती. त्यांनतर पुढे जाऊन त्यांनी प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या टीममध्ये आपलं स्थान निर्माण केलं होतं. ते उत्तम कोंगोवादक होते. (Nirmal Mukherjee Passed Away)

 

लक्ष्मीकांत-प्यारेलाल, पंचमदा, राजेश रोशन, कल्याणजी-आनंदजींसह अनू मलिक,
जतिन-ललित ते थेट विशाल-शेखर आदी संगीतकारांकडे त्यांनी बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका,
डी-जेंबे अशी वाद्ये वाजवली आहेत. सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकूमत होती.
हिंदी, बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर ते मराठी आणि मालवणी बोलत असत.
अरविंद हळदीपूर यांच्याबरोबर एक होती वादी, झाले मोकळे आकाश या मराठी चित्रपटांबरोबरच यही है जिंदगी
या हिंदी चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. अरविंद-निर्मल या नावाने ते संगीत देत असत.
त्यांनी काही अल्बमही काढले. त्यांनी ‘गणपती आले माझे घरा’ या अल्बमसाठी संगीतबद्ध केलेले ‘
अशी चिकमोत्याची माळ’ गीत खूप गाजले होते.या गाण्याची लोकप्रियता आजही जशीच्या तशी आहे.
त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nirmal Mukherjee Passed Away | chikmotyachi maal fame popular instrumentalist and composer nirmal mukherjee has passed away

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉलला २८ लाखांना गंडा घालणार्‍या मॅनेजरला अटक

Health Tips | ताप, सर्दी-खोकला! डॉक्टर सांगतात – किचनमध्ये पहा, सोपे आहे रोगांपासून वाचणे आणि इम्युनिटी वाढवणे

 

Related Posts