IMPIMP

Nitesh Rane | नितेश राणे यांना मोठा दणका ! 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

by nagesh
Nitesh Rane | big hit to bjp mla nitesh rane two days in police custody

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार (BJP MLA) नितेश
राणे (Nitesh Rane) यांना मोठा दणका बसला आहे. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर (Bail Application Rejected) त्यांच्यावर
अटकेची टांगती तलवार होती आणि आज ते कणकवली न्यायालयासमोर (Kankavali Court) शरण (Surrender) आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणे (Nitesh Rane) यांना दोन दिवस पोलीस कोठडीत रात्र काढावी लागणार आहे. आमदार नितेश राणे यांचा मुक्काम जिल्हा पोलीस मुख्यालय (District Police Headquarters) येथे असणार आहे. चौकशीसाठी फक्त कणकवली पोलीस ठाण्यात आणतील. (Nitesh Rane Remanded Police Custody For 2 Days)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक (Shivsena) संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांनी आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) अज्ञातवासात गेले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (Application for Pre-Arrest Bail) दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने (District Court) हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

 

दिवसभरात कोर्टात झालेल्या घडामोडीनंतर नितेश राणेंनी शरणागती पत्करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात (Kankavali Civil Court) दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने (State Government) बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

 

याआधी जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटळला असल्याने ते जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र उच्च न्यायालयासमोरील अर्जही निवेदनासह मागे घेण्यात आला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीश मानशिंदे (Lawyer Satish Manshinde) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nitesh Rane | big hit to bjp mla nitesh rane two days in police custody

 

हे देखील वाचा :

Blood Sugar Control | डायबिटीजच्या रुग्णांनी ‘या’ 5 मसाल्याचे करावे सेवन, Blood Sugar राहील नियंत्रित

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’

Gold-Silver Rates Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदी 339 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

 

Related Posts