IMPIMP

Nitesh Rane | ‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे, त्याच्यावर बोलून …’ नितेश राणेंचा प्रहार

by nagesh
BJP MLA Nitesh Rane | nitesh ranes letter to jitendra awha ajit pawar was also targeted

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन अमरावती येथे आज (दि. 13) भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या मुलाचा लग्नसोहळा संपन्न होत आहे. यावेळी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी याठिकाणी हजेरी लावली. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील हजेरी लावली. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांच्यासोबत संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना ऋतुजा लटके (Rutuja Latake) आणि अंधेरी येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीवर प्रश्न विचारला असता, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय करतात, त्याच्यावर मी चिंता करत नाही. संपलेला माणूस आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलून आजच्या गोड प्रसंगी तोंड कडू करणार नाही, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धुळ्यात ईद सणाचा जल्लोष साजरा करताना काही आक्षेपार्ह नारे देण्यात आले होते. यावर देखील राणेंनी भाष्य केले. अशी नाटके आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे सण मर्यादा पाळून आणि शांततेत साजरे केले पाहिजेत. आक्षेपार्ह नारे आणि घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. पोलीस अशा लोकांचा शोध घेऊन कारवाई करतील, असे राणे म्हणाले.

 

तसेच राज्यात आता महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) नाही आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहेत, नवाब मलिक अल्पसंख्यांक मंत्री नाहीत,
त्यामुळे हिंदूंना कोणतेही आव्हान कोणीही द्यायचे नाही, ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. आगामी काळात लोकांच्या तोंडून अशी भाषा निघणार नाही, त्यांची जीभ अश्या घोषणा देण्यासाठी वळवळणार नाही, याचा बंदोबस्त आमचे सरकार करेल, असे नितेश राणे म्हणाले.

 

 

Web Title :- Nitesh Rane | ‘Uddhav Thackeray is a finished man, talking about him…’ Nitesh Rane’s attack

 

हे देखील वाचा :

Thank God Movie | अजय देवगणचा ‘थँक गॉड’ चित्रपट रिलीजपूर्वी ‘या’ कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात

Pune ACB Trap | ठेकेदाराकडून 10 हजार रुपये लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune NCP | पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्षपदी डॉ. निकिता मयूर गायकवाड यांची निवड

Double XL Trailer Release | बहुचर्चित डबल एक्सएल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज

 

Related Posts