IMPIMP

Nitin Gadkari | कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय, गडकरींनी दिली माहिती

by nagesh
Union Minister Nitin Gadkari | bjp leader and union minister nitin gadkari statement on offer to join congress

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कारमध्ये
मागील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची (Threepoint Seat Belts) व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना
(Car Manufacturing Company) मध्यभागी बसणाऱ्या प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करुन द्यावा लागेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री (Union Road Transport Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले. गुरुवारी एका पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रस्ते अपघातातील (Road Accidents) जीवितहानी कमी करण्यासाठी कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे थ्री पॉईंट देणं आता कार कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. याबद्दलच्या फाईलवर मी कालच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता कारच्या मागील सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तींसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट देणं बंधनकारक असल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी सांगितले.

 

सध्या पुढच्या दोन्ही सीटवर आणि पाठिमागच्या दोन सीटवर थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध आहेत.
मागच्या सीटवर केवळ टू पॉईंट सीट बेल्ट देण्यात येतात.
परंतु प्रवाशांची सुरक्षा (Passenger Safety) लक्षात घेऊन सीट बेल्ट वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
तसेच दरवर्षी देशात जवळपास 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ही संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nitin Gadkari | it is now mandatory for all seats in the car to have threepoint seat belts Union Minister Nitin Gadkari

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

Pune Crime | कोंढव्यातील थरार ! सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

 

Related Posts