IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

by nagesh
Kirit Somaiya | now sanjay rauts stay will be nawab maliks neighbor in arthur road jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये (PMC Jumbo Covid Hospital) झालेल्या घोटाळासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) भेटण्यासाठी आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटने नंतर किरीट सोमय्या आज (शुक्रवार) पुन्हा पुण्यात आले आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना ज्या पायरीवर शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी पाडून जखमी केले होते. त्याच पायरीवर आता भाजप त्यांचा सत्कार करत शिवसेनेला उत्तर देणार आहे. त्यापूर्वी त्यांनी पुणे विमानतळावर (Pune Airport) पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर गांभीर आरोप केले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खळण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी दिला आहे का? उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मदतीने कोविडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप केले आहे. त्यांच्यावर कारवाई (Action) झाली पाहिजे. मी आज पुन्हा एकदा पोलीस, महापालिका यांना आग्रह करणार आहे की, घोटाळा करणारी कंपनी हेल्थकेअर लाइफलाइन (Healthcare Lifeline) यांच्यावर कारवाई करा, असे सोमय्या यांनी सांगितले.

राऊतांना जाब द्यावा लागेल
मागील वेळी मुख्यमंत्री कार्यालयाने 100 गुंड पाठवले आणि तक्रार होऊ दिली नाही, कारवाई कशी होत नाही, पाहतोच, असा इशारा सोमय्या यांनी यावेळी दिला. सत्कारासंदर्भात बोलताना सोमय्या म्हणाले, सत्काराला महत्व नाही. त्या कंपनीवर कारवाई करावी लागणारच आहे. संजय राऊतांना जाब द्यावा लागेल असे म्हणाले.

 

… तर ते मुर्ख आहेत
संजय राऊत धमकी कोणाला देतात? संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आहे की लोकांचा जीव घेणार, बोगस कंपन्यांकडून कंत्राट घेणार.
महाराष्ट्रातील जनतेची हत्या होऊ देणार आणि त्यानंतर काही होणार नाही असे जर त्यांना वाटत असेल तर ते मुर्ख आहेत.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) जेलमध्ये गेलेत. राऊतांचे मित्र, परिवार, पर्टनर यांच्यावर देखील कारवाई होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मी धमक्यांना घाबरत नाही
उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी धमक्या दिल्या म्हणजे सोमय्या घाबरेल असे त्यांना वाटत असेल.
यांच्यापैकी एकजण अनिल देशमुखांच्या खोलीत विराजमान होईल त्यावेळी त्यांना कळेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya pune municipal corporation shivsena uddhav thackeray sanjay raut pmc jumbo covid centre scam Healthcare Lifeline

 

हे देखील वाचा :

Mayor Murlidhar Mohol | राज्य शासनाने शिवजयंतीला मिरवणूकीची परवानगी द्यावी; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याची व्यवस्था’

Pune Crime | कोंढव्यातील थरार ! सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेससह संजय राऊत यांच्यावर टीका; म्हणाले…

 

Related Posts