IMPIMP

Pune Crime | कोंढव्यातील थरार ! सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोंढव्यातील (Kondhwa) सराफ दुकानात शिरुन गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याच्या हातात पिस्तुल असतानाही धाडसाने एका पोलीस अंमलदाराने (Pune Police) झडप घालून त्याला पकडले. पिस्तुल घेऊन पळून जाणार्‍यास पकडणारे पोलीस अंमलदार अंकुश केंगले (Police Ankush Kengle) यांचे कौतुक केले जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime)

 

याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दिलेल्या माहितीनुसार, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसलेले असताना दुचाकीवरुन सौद सय्यद व रुहान खान हे दोघे आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करु लागले. गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली. या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ लागले. त्याचे वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत येत होते. दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौद हा पिस्तुल घेऊन येत होता (Pune Crime). तरीही न डगमगता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याच्या साथीदार पळून गेला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) ,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर (Police Jagannath Jankar) व अन्य पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंकुश केंगले यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

 

Web Title :- Pune Crime | The thrill in Kondhwa ! Police officer boldly catches thief fleeing after firing at goldsmith shop

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वृद्धापकाळात आधारासाठी ‘स्थळ’ पाहणार्‍या 81 वर्षाच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची फसवणूक; विवाह संस्थांच्या 3 महिलांविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime | अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेला 1 लाखांचा घातला गंडा; खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीतील घटना

Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडी, उत्तर भारतातील थंडी मंदावली – IMD

 

Related Posts