IMPIMP

Nitin Gadkari On Toll Plaza | आगामी काळात रस्त्यावरुन सर्व ‘टोल प्लाझा’ हटवले जाणार – नितीन गडकरी

by nagesh
No Toll Plaza on Highway | no toll plaza on national highway government is bringing anpr system much better than fastag

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Nitin Gadkari On Toll Plaza | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वच वाहनधारकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. सरकार लवकरच Global Positioning System (GPS) आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टम (Toll Tracking System) आणणार आहे. त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS इमेजिंगच्या माध्यमातून टोलची रक्कम वसूल केली जाईल.’ अशी माहिती गडकरी यांनी संसदेत दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन (Toll lane) नसेल.
टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार असल्याचं,’ नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

 

 

”लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर (National Highway) दर 60 किमीच्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल.
तर, मध्येच असलेले सर्व टोल आगामी 3 महिन्यात हटवले जातील.
टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही.
त्याचबरोबर नागरीकांचा वेळही वाचण्यास मदत होईल.
जीपीएस टोल संकलन (GPS Toll Collection) पद्धतीत चालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट केले जातील.
या टोल कलेक्शनच्या पद्धतीने भविष्यात नागरिकांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जितक्या रोडचा वापर केला गेला. तेवढाच टोल द्यावा लागेल. असे गडकरी म्हणाले.

 

Web Title :- Nitin Gadkari On Toll Plaza | toll plaza big news all toll plaza will be removed from street said nitin gadkari

 

हे देखील वाचा :

Neha Sharma Bralette Photos | नेहा शर्मानं कॅमेरा समोरच उघडलं कोटचे बटनं अन् फ्लॉन्ट केली पारदर्शक ‘ब्रालेट’

Pune Cyber Police | तुमच्या सोशल मीडियावरील ‘मेसेज’वर पोलिसांचा ‘वॉच’, वेळप्रसंगी जेलमध्ये…

Bees Attack on Pune IT Engineers | सिगारेटच्या धुराने केला घात ! फिरायला गेलेल्या पुण्यातील IT इंजिनिअर्सवर मधमाशांचा हल्ला; 11 जखमी तर काही बेशुद्ध

 

Related Posts