IMPIMP

OBC Reservation Maharashtra | ओबीसी आरक्षणाचा डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी सांगितली महत्वाची माहिती

by nagesh
obc-reservation-maharashtra-ncp-leader-and-maharashtra-dcm-ajit-pawar-on-obc-reservation-update-empirical-data

नायगाव : सरकारसत्ता ऑनलाइनसुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य सरकारने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत (OBC Reservation Maharashtra) काढलेला अध्यादेश (Ordinance) रद्द केला आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation Maharashtra) राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पीरिकल डेटा (Imperial Data) गोळा करण्यावरुन आता खलबतं सुरु झाली आहे. हा डेटा कधीपर्यंत मिळणार यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation Maharashtra) डेटा मार्चपर्यंत गोळा होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांच्या (CM) उपस्थितीत आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत विचारलं होतं तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत डेटा गोळा करु असे सांगितले होते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देशातील इतर राज्यांमध्ये देखील निर्माण झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) कायदा करणे आवश्यक होते. परंतु आम्ही तशी मागणी केली तर ते म्हणतात आम्ही टोलवाटोलवी करतो, असंही पवार यांनी म्हटले.

 

सावित्रीबाई फुलेंच्या (Savitribai Phule) 191 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी नायगावमध्ये (Naigaon) असलेल्या सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अजित पवार आले होते. नायगाव येथील नेवसे वाड्यात (Nevse Wada) हे स्मारक आहे. 3 जानेवारी 1931 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म त्यांचे वडील खंडोजी नेवसे (Khandoji Nevse) यांच्या नायगाव येथील वाड्यात झाला होता. आता या वाड्याचे राज्य शासनातर्फे (State Government) स्मारकामध्ये रुपांतर करण्यात आलंय

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थान असलेल्या
नायगावमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
नायगाव मध्ये चांगले ग्रामसचिवालय उभारले जाईल. याठिकाणच्या शाळेच्या इमारतीची काहीशी दुरावस्था झाली असून
यासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले.

 

हे देखील वाचा :

Lockdown in Maharashtra | राज्यात लॉकडाऊनचे संकेत?, अजित पवारांचं साताऱ्यात मोठे विधान

Nashik Crime | धक्कादायक ! ‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून 24 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

 

 

 

Related Posts