IMPIMP

Nashik Crime | धक्कादायक ! ‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून 24 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Nashik Crime | एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik Crime) येथील सिडको परिसरात घडली आहे. या घटनेबाबत समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट (Suicide Note) आढळून आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी, प्रियांका पगारे (Priyanka Pagare) (वय, 24 रा. सिडको परिसर, खटवडनगर, नाशिक) असं आत्महत्या (Suicide) केलेल्या
नवविवाहितेचं नाव आहे. प्रियांका हिने रविवारी (2 जानेवारी) रोजी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
आत्महत्येची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी नागरीकांची गर्दी जमली होती. (Nashik Crime)

दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करत असताना पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. ‘आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, मृत प्रियांका यांनी आत्महत्या का केली असावी ? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अंबड पोलिसांनी (Ambad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Nashik Crime | 24 years old newly married woman commits suicide by jumping from terrace in nashik

 

हे देखील वाचा :

Upcoming IPO | तयार ठेवा पैसे ! येणार आहेत कमाईच्या 23 संधी, अदानीपासून बाबा रामदेव पर्यंतच्या कंपन्यांचे येणार आयपीओ

Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या

Home Loan | प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी Pre-EMI आणि Full-EMI बद्दल जरूर जाणून घ्या, दोन्हीमध्ये आहे खूप फरक

 

Related Posts