IMPIMP

Omicron Covid Variant | अखेर ओमायक्रॉनचा धारावीत शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क; मौलवीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

by nagesh
Omicron Covid Variant | omicron infiltration in dharavi mumbai maulavi report comes positive

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Corona new variant) ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) मुंबईत हातपाय पसरत आहे. मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये (Dharavi slum) ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. परदेशातून आलेल्या एका मौलवीचा (maulavi) ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा (Omicron Covid Variant) पहिला रुग्ण डोंबिवलीमध्ये आढळून आला होता. मात्र, या रुग्णाने कोरोनावर मात केल्याने मोठा दिलासा मिळाला. परंतु आता परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid report positive) आला आहे. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

पूर्व आफ्रिकेतील टांझानिया (Tanzania East Africa) येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबईत आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीत वास्तव्यास होते. सुरुवातीला या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये (Seven Hills Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. त्याचा स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत सापडलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण देखील टांझानिया मधून आला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

आरोग्य यंत्रणेला जी भीती होती तेच झाले आहे. अखेर धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.
या मौलवीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
या मौलवीला तातडीने क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे.
धारावीत आज सापडलेल्या रुग्णामुळे आता महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 11 वर गेली आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron infiltration in dharavi mumbai maulavi report comes positive

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | चांदीमध्ये मोठी घसरण, सोने 47 हजाराच्या पुढे; जाणून घ्या आजचे नवीन दर

DPDC Meeting Pune | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय ! 793 कोटी 86 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

PMMY Scheme | 50 हजारपर्यंत मुद्रा लोन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 15 डिसेंबरपर्यंतच मिळेल विशेष सूट

 

Related Posts