IMPIMP

Pankaja Munde | शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? पंकजा मुंडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

by nagesh
Maharashtra MLC Elections 2022 | bjp pankaja munde supporters tried to attack party office in aurangabad

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Pankaja Munde | मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भुंकप झाला. अनेक वर्ष असलेली भाजप आणि शिवसेनेची (BJP And Shiv Sena) युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झालं. सर्वाधिक जागा मिळून देखील भाजप सत्तेपासून दूर राहिला. तेव्हापासून भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार असे भाकीत अनेकवेळा होताना दिसत आहे. नागपूर दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. यानंतर आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही सुचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राऊत यांच्या भूमिकेवर माध्यमांनी बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचक विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आत्ता यावर मला टिप्पणी करता येणार नाही. पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि निर्णय घेणारे लोक याबाबत निर्णय घेतील. पण राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे”, दरम्यान, पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे होकार दिला नसला तरी स्पष्टपणे नकारही दिला नसल्याचं म्हटलं जात आहे.

 

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेवरुन राजकीय वातावरण रंगलं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याबाबत प्रस्ताव दिला.
एमआयएमला देखील महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे,
असं म्हणत विरोधकांनी त्यावरून टीका केली असताना शिवसेनेकडूनही विरोधकांची चाल असल्याचं टीकास्त्र केलं जातं आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या विधानामुळे एक नवी चर्चा रंगली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde hints at bjp shivsena coming together again on sanjay raut statement

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Hemant Rasne | हेमंत रासने यांची महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sharad Pawar | मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

 

Related Posts