IMPIMP

Rupali Chakankar | ‘चार दिवसांत दूध का दूध होईल’; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

by nagesh
Rupali Chakankar | rupali chakankar chitra wagh raghunath kuchik molestaion case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Chakankar | शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये भाजप नेत्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अशातच यावर राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपली प्रतिक्रिया देताना चार दिवसांत दूध का दूध होईल, असं म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणातील पीडित मुलीने शनिवारी रात्री मेल (Mail) करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या मेलमध्ये तिने केलेल्या मागणीचा अर्ज (Application) आम्ही पुणे पोलिसांना (Pune Police) पाठवला आहे. तिने यामध्ये संपुर्ण मेडिकल तपासणीची (Medical Test) मागणी केली असून तिची तपासणी केली जावी यासाठी पोलिसांना लवकरच पत्र पाठवणार असल्याचं रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितलं.

 

याआधी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीनेही महिला आयोगाला मेल करत, यामध्ये संबंधित फिर्यादी आणि चित्रा वाघ या संगनमताने मीडिया ट्रायल चालवत आहेत.
अपमानजनक टीका करत आहेत त्यामुळे कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.
त्यांची नार्को चाचणी (Narco Test) करावी आणि त्या अनुषंगाने पोलीस चौकशी व्हावी पोलीस चौकशीनंतरचा अहवाल महिला आयोगाला पाठवावा,
अशी मागणी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, चार दिवसानंतर काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चाकणकरांच्या (Rupali Chakankar) या वक्तव्यावर चित्रा वाघ काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | rupali chakankar chitra wagh raghunath kuchik molestaion case

 

हे देखील वाचा :

Hemant Rasne | हेमंत रासने यांची महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sharad Pawar | मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर झालेल्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Madhuri Dixit Gorgeous Look | वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा माधुरी दिक्षित दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts