IMPIMP

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन

by nagesh
Parag Bedekar Passes Away | actor director parag bedekar passes away at age of 48

सरकारसत्ता ऑनलाईन – ‘आभाळमाया’ या मालिकेतून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar Passes Away) यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या 47 व्या वर्ष अखेरचा श्वास घेतला. आभाळमाया या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे, तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आजवर पराग बेडेकर (Parag Bedekar Passes Away) अनेक नाटकांमधून प्रेक्षकांसमोर आले. ते शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीवर सक्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकलाकारांना देखील याचा मोठा धक्का बसला आहे.

 

पराग बेडेकर यांच्यासाठी अभिनेता सागर खेडेकरने फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी परागचा फोटो शेअर करत म्हटले की, “मित्रा खूपच लवकर सोडून गेलास. अजून आपल्याला अनेक नाटकात काम करायचे होते. तुझ्या या अचानक जाण्याने आम्हाला खूपच धक्का बसला आहे आणि तू इतका लांब गेलास की तिथून आता कधीच येऊ शकत नाही. कदाचित तुला बरं वाटत असेल पण आम्ही मात्र दुःखी झालो आहोत. मिस करीन तुला यार… जिथे कुठे असशील सुखी राहा मित्रा… पऱ्या तुझ्या आत्म्यास शांती मिळो”. सध्या सागर यांच्या या पोस्टला अनेक चाहते कमेंट करून परागला श्रद्धांजली वाहत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परागने आजवर कुंकू’,‘चारचौघी’,‘एक झुंझ वादळाशी’,‘ओढ लावी जिवा’,‘आभाळमाया’ या अशा
लोकप्रिय मालिकांमधून कौतुकास्पद भूमिका साकारल्या होत्या. तर त्यांनी ‘यदा कदाचित’,
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘पोपटपंची’, ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘लाली लीला’ या नाटकांमध्ये देखील उत्तम काम
केले आहे. पराग हा एक उत्तम दिग्दर्शक ही होता.

 

Web Title :- Parag Bedekar Passes Away | actor director parag bedekar passes away at age of 48

 

हे देखील वाचा :

Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”

Kane Williamson Steps Down | केन विल्यमसनने सोडले कसोटी कर्णधारपद, ‘हा’ खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा

Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

 

Related Posts