IMPIMP

Parambir singh | परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून SIT ची नेमणूक; 2 DCP, 2 ACP अन् महिला PI च्या अडचणी वाढ?

by nagesh
Parambir singh | appoints sit by mumbai police to probe crime against former commissioner of parambir singh

मुंबई न्यूज (Mumbai News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Parambir singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh) यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे यातील काही फिर्यादी हे पोलीस अधिकारीच (Police officer) आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (Case Of extortion Registered) करण्यात आला होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या खंडणीच्या गुन्ह्यासह परमबीर सिंग (Parambir singh) यांच्याविरोधातील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) दर्जाचा अधिकारी असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (Assistant Commissioner of Police) दर्जाचा
अधिकारी करेल.
तसंच या एसआयटीमध्ये पोलीस निरीक्षक (Police inspector), सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उप निरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

 

 

काही दिवसांपूर्वी भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल (Builder Shyamsunder Agarwal Bhainder) यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये (Marine Drive Police Station)
दिलेल्या फिर्यादीवरून परमबीर सिंह आणि इतर पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध
15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा (FIR) नोंदवला आहे.
या गुन्ह्याचा तपास एसआयटी करणार आहे. त्याचबरोबर जुहू पोलीस स्टेशनमध्ये (Juhu Police Station) तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मोक्का (MCOCA Action) Mokka
अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास देखील एसआयटी करणार आहे.
श्यामसुंदर अग्रवाल यांचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील (Underworld don Chhota Shakeel) याच्याशी संबंधी असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईत एक तर ठाण्यामध्ये दोन असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

 

 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (former mumbai commissioner param bir singh) यांच्यासह 5 पोलिस अधिकार्‍यांवर मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खंडणीचा
गुन्हा दाखल झाल्याने संबंधित पोलिस अधिकार्‍यांची जनहितार्थाच्या कारणास्तव बदली करण्यात आली आहे.
त्यांना अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस) नायगांव (मुंबई) यांच्या कार्यालयाशी सलग्न (Police Officer Transfer) करण्यात आले आहे. त्याबाबतचा आदेश मुंबईचे पोलिस
आयुक्त हेमंत नगराळे (mumbai police commissioner hemant nagrale) यांनी दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिस उपायुक्त अकबर पठाण deputy commissioner of police akbar pathan (सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, प्रकटीकरण, डी-1, मुंबई), उपायुक्त पराग मणेरे deputy commissioner of police parag manere (सध्याची नेमणुक – आर्थिक गुन्हे, मुंबई), सहाय्यक आयुक्त संजय पाटील assistant commissioner of police sanjay patil (सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, मुंबई), सहाय्यक आयुक्त सिध्दार्थ शिंदे assistant commissioner of police sidharth shinde
(सध्याची नेमणुक – गुन्हे शाखा, मुंबई) आणि महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके
police inspector asha korke (सध्याची नेमणुक – आझाद मैदान, पोलिस स्टेशन)
यांना अप्पर आयुक्त (सशस्त्र पोलिस) नायगांव यांच्या कार्यालयाशी सलग्न करण्यात आले आहे.

 

 

 

संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अकबर पठाण यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त प्रकाश जाधव (deputy
commissioner of police prakash jadhav) तर उपायुक्त मणेरे यांच्रूा पदाचा
अतिरिक्त कार्यभार उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (deputy commissioner of police dr. shrikant paropkari) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सहाय्यक आयुक्त संजय पाटील आणि सिध्दार्थ शिंदे यांच्याकडील कार्यभाराबाबत
सह आयुक्त (गुन्हे शाखा) हे पर्याय व्यवस्था करणार आहेत.
तर महिला पोलिस निरीक्षक आशा कोरके यांच्याकडील कार्यभाराबाबत अप्पर आयुक्त
(दक्षिण प्रादेशिक विभाग) हे अंतर्गत पर्यायी व्यवस्था करणार आहेत.

 

 

Web Title : Parambir singh | appoints sit by mumbai police to probe crime against former commissioner of parambir singh

 

हे देखील वाचा :

Police Officer Transfer | मुंबईतील पोलिस उपायुक्त पठाण व मणेरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील व शिंदे आणि मपोनि आशा कोरके यांची बदली

Mumbai High Court | शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेला हायकोर्टाकडून ‘दिलासा’

Pune Rural Police | शिक्रापूर परीसरातील खंडणीखोर वैभव आदकवर अखेर ‘मोक्का’

 

Related Posts