IMPIMP

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ ! …तर अटक वॉरंट निघणार?

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Anti Corruption interrogates Parambir Singh for 2 hours in Police Inspector Anup Dange reported the case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांंनी माजी गृहमंत्र्यावर आरोप केलेल्या शंभर कोटी रुपये लेटरबाॅम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्व घडामोडीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) परमबीर सिंहांना अनेक वेळा समन्स बजावलं. मात्र, सिंह हे हजर झाले नाहीत. दरम्यान, आज (सोमवारी) परमबीर यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मागील प्रत्येक सुनावनीस परमबीर सिंह (Parambir Singh) हे उपस्थित राहत नाहीत. चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार समन्स बजावलं. पंरतु, सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर राहीले नाहीत. या प्रकरणाची चौकशी आज (सोमवारी) होणार आहे. आज परमबीर उपस्थित न राहिल्यास त्यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) अटक वारंट निघण्याची शक्यता आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

परमबीर यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपावरुन चौकशीसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती केली. चांदीवाल कमिशनने चौकशी सुरू केल्यापासून परमबीर सिंह (Parambir Singh) वैद्यकीय कारणांमुळे रजेवर आहेत. चौकशी समितीसमोर उपस्थित न राहिल्यामुळे परमबीर यांना पन्नास हजाराचा दंड सुनावण्यात आला होता. सिंह यांनी दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्याची माहिती आहे. परमबीर यांनी सरकारने चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगावर प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केलीय.

दरम्यान, ठाणे पोलिसांच्या ताब्यात असणारे संजय पुनुमिया (Sanjay Punumia) हे परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.
सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनुमिया यांनी समृद्धी महामार्गालगत जमिनी लाटल्याचा संशय आहे आणि या जमीन खरेदीशी परमबीर यांचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत.

Web Title :- Parambir Singh | Parambir Singh’s difficulty increases! … so an arrest warrant will be issued?

हे देखील वाचा :

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील

Crime News | 28 वर्षीय तरुणाने 15 वर्षीय मुलीवर महिनाभर केला लैंगिक अत्याचार

Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक

Related Posts