IMPIMP

Patra Chawl Scam | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने पाठवले समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut gets bail know his first reaction from pmla court

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Scam) शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) हे ईडीच्या कोठडीत (ED Custody) आहेत. यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने समन्स (ED Summons) बजावलं आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) वर्षा राऊत यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांची साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मनी लाँडरिंग प्रकरणी (Money Laundering Case) संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षा यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँकेतून 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 8 लाख अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत त्यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून त्याबाबत ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे.

दरम्यान, संजय राऊत यांची आज ईडी कोठडी संपली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा विशेष PMLA कोर्टात (Special PMLA Court) हजर करण्यात आले.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने 10 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवून मागितली होती.
काही जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांची कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली.
न्यायालयाने संजय राऊतांची 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडीत वाढ केली.
त्यामुळे राऊतांचा पुढील 4 दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.

Web Title :- Patra Chawl Scam | ed sent summons to sanjay rauts wife varsha raut

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | दारुचा ग्लास सांडला म्हणून मित्राचा खून, मृतदेह फेकला कचऱ्यात; हिंजवडी पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Pimpri Crime | क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; शहा, नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता

Related Posts