IMPIMP

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

by nagesh
Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Boys Cricket Tournament; Cricket Next Academy team won the title !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पोलीसनामा ऑनलाइन – क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament) १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९८ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर झालेल्या सामन्यात श्रवदे देसाईच्या नाबाद १०६ धावांच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीने ४५ षटकामध्ये ७ गडी गमावून २८३ धावा धावफलकावर लावल्या. श्रवण देसाई याने ९२ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०६ धावांची खेळी केली. शौर्य देशमुख याने ५२ धावांची आणि युग सोनिग्रा याने ३६ धावांची खेळी केली. श्रवण आणि शौर्य यांनी पाचव्या गड्यासाठी १११ चेंडूत १३१ धावांची भागिदारी करून संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.

या आव्हानासमोर अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १८५ धावांवर मर्यादित राहीला. श्रवण व्हावळ (४४ धावा) आणि रणवीर पांगारे (नाबाद २८ धावा) यांनी छोट्या खेळी केल्या पण संघाचा पराभव टाळू शकले नाही. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र १४ वर्षाखालील क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक विराग आवटे, जीएसटी विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रशांत सातव, अर्थव पॅटसनचे संचालक रमेश पाटील, कोटक महिंद्राचे उपाध्यक्ष बिक्रमजीत सेन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबईतील निशाध कोरा, सहभागी संघातील प्रशिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे संचालक नितीन सामल यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि नंदकिशोर कुमावत यांनी आभार मानले.

 

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ ChampionshipUnder 13 Boys Cricket Tournament; Cricket Next Academy team won the title !!

File Photo

 

 

स्पर्धेतील विजेता क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि २१ हजार रूपये तर,
उपविजेत्या अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि ११ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू श्रवण देसाई (क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, २०५ धावा आणि ७ विकेट),
सर्वोत्कृष्ट फलंदाज श्रेयस हेकारे (नाशिक जिमखाना,
२३९ धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज तनिष जैन (क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, १० विकेट),
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक शौर्य कोंडे (अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी) अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आले.
स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूचा मान आर्य कुमावत (ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी १९१ धावा आणि ८ विकेट) याला देण्यात आला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः ४५ षटकात ७ गडी बाद २८३ धावा (श्रवण देसाई नाबाद १०६ (९२, १३ चौकार, १ षटकार),
शौर्य देशमुख ५२ (५३, ५ चौकार), युग सोनिग्रा ३६, रवि पांगारे २-५२);
(भागिदारीः पाचव्या गड्यासाठी श्रवण आणि शौर्य यांच्यात १३१ (१११)
वि.वि. अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३९.३ षटकात १० गडी बाद १८५ धावा (श्रवण व्हावळ ४४,
रणवीर पांगारे नाबाद २८, तनिश जैन २-२७, संस्कार सोने २-३५, श्रवण देसाई २-४३); सामनावीरः श्रवण देसाई;

Web Title : Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship
Under 13 Boys Cricket Tournament; Cricket Next Academy team won the title !!

Related Posts