IMPIMP

Corporator Vasant More | ‘छत्तीसगड’च्या भाजप पदाधिकाऱ्याची वैयक्तिक कामासाठी पुण्यात ‘मनसे’ला साद ! दिवसांत सोडवला ‘लाखों’चा प्रश्न

by nagesh
PCorporator Vasant More | BJP office bearer of Chhattisgarh come to pune for personal work and MNS help him ! The problem of millions solved in days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा अभिमान भारतीय जनता पार्टी (BJP) करत असली तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःची कामे करून घेण्यासाठी विरोधकांचे ‘दरवाजे’ ठोठवावे लागतात हे उघड करणारी घटना नुकतीच पुण्यात (Pune News) घडली. त्यातही हटके स्टाईल असलेल्या मनसे (MNS) चे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी भाजपच्या त्या पदाधिकाऱ्याचे ‘लाखों रुपयांचे’ काम केवळ एका फेसबुक पोस्ट (Facebook Post) द्वारे केल्याने भाजपचा पदाधिकारीही मोरे (Corporator Vasant More) यांचा फॅन झाला.

नुकतेच छत्तीसगड (Chhattisgarh) येथील एका पदाधिकाऱ्याने वसंत मोरे (Corporator Vasant More) यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला. सचिन मेघवाल (Sachin Meghwal) असे त्याचे नाव. मनसे फेसबुक पेजवरून (MNS Facebook Page) नंबर मिळाल्याचे स्पष्ट करत त्याने नागपूर (Nagpur) येथे राहणाऱ्या नातेवाईकाचे पुण्यात महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी पुण्यातील एका परिचिताने दहा लाख रुपये घेतले आहेत. परंतु प्रवेश तर मिळालाच नाही, पण संबंधित व्यक्ती पैसे परत करण्यासही टाळाटाळ करत असल्याचे त्याने नमूद केले.

 

वसंत मोरे यांनी मेघवाल यांच्याशी संवाद साधताना पुण्यात भाजप सत्तेत आहे. त्यांचे 100 नगरसेवक व बडे पदाधिकारी आहेत, अशा वेळी त्यांच्याकडे मदत मागण्याऐवजी मला का फोन केला असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मेघवाल यांनी भाजपच्या ‘ जगदीश ‘ (Jagdish) यांना फोन केला परंतु त्यांनी बरेचदा कॉल करूनही तो उचलला नाही. तुमचे मनसे फेसबुकवर काम पाहात असून माझ्या नातेवाईकांचे काम व्हावे यासाठी तुम्हाला कॉल केला असे सांगितले. मोरे यांनी त्यांचे काम समजून घेतले व संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांक ही घेतला.

 

फेसबुकवर हजारो फॅन फॉलोवर असलेल्या मोरे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये मेघवाल आणि त्यांच्यातील संवादाची फोटोसह क्लिपच फेसबुकवर पोस्ट केली. काही वेळातच मोरे यांना संबंधित व्यक्तीने येथीलच राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shiv Sena), भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ती व्यक्ती सोबर असून तातडीने पैसे द्यायला तयार आहे. फक्त तेवढी फेसबुक पोस्ट काढा अशी विनंती केली. मोरे यांनीही त्यांचा मान ठेवत पोस्ट काढून टाकली.

 

 

त्या व्यक्तीने देखील दुपारी मोरे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समजावून सांगितली व काही रक्कम व धनादेश मोरे यांच्याकडे आणून दिले.
मोरे यांनी मेघवाल यांच्याशी संपर्क साधून रक्कम ऑनलाईन पाठवून दिली.
तर 2 दिवसांनी मेघवाल व त्यांचे नागपूरस्थित नातेवाईक पुण्यात मोरे यांच्याकडे येणार आहेत, अशी माहिती मोरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याने दिली.

यासंदर्भात वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मेघवाल माझ्यासाठी अपरिचित होते.
परंतु काम घेऊन आलेल्या कोणाला निराश करायचे नाही, शक्यती मदत करायची हा माझा स्थायीभाव आहे.
फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर मला विविध पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फोन करून ज्या व्यक्तीने पैसे घेतले आहेत
ती व्यक्ती त्यांच्या परिचित असून सरळमार्गी असल्याचे सांगितले.

 

त्या व्यक्तीनेही शक्य तितक्या लवकर पैसे देतो असे सांगितल्याने मी पोस्ट काढून टाकली.
पुढील काही तासातच त्या व्यक्तीने काही रक्कम रोख (Cash Amount) स्वरूपात आणून दिली व पुढील तारखेचे धनादेश दिले.
रक्कम ऑनलाईन बँकिंग (Online Banking) द्वारे मेघवाल यांना पाठवून दिली असून दोन दिवसांत ते व त्यांचे नातेवाईक येथे येणार आहेत.
त्यावेळी धनादेश (Check) घेऊन जातील.

Web Title :- PCorporator Vasant More | BJP office bearer of Chhattisgarh come to pune for personal work and MNS help him ! The problem of millions solved in days

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Cyber Police | पुणे सायबर पोलिसांकडून 28 वर्षीय तरूणीला अटक ! हाय प्रोफाईल महिलांसोबत ‘सेक्स’ करण्यातून पैशाचे आमिष; 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाखांची फसवणुक

Gopichand Padalkar | एसटी कामगार संपाबाबत पडळकरांचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हा सरकारचा सुनियोजित कट’

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

Related Posts