IMPIMP

Pune Cyber Police | पुणे सायबर पोलिसांकडून 28 वर्षीय तरूणीला अटक ! हाय प्रोफाईल महिलांसोबत ‘सेक्स’ करण्यातून पैशाचे आमिष; 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाखांची फसवणुक

by nagesh
Pune Cyber Police | Deepali Kailas Shinde arrested by Pune Cyber Police The lure of money from having Physical Relation with high profile women Fraud of Rs 60 lakh 76 year old businessman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Cyber Police | हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून (Physical Relation With High Profile Woman) भरपूर पैसे (Earn Money) मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) एका महिलेला अटक (Pune Crime) केली आहे.

दिपाली कैलास शिंदे Deepali Kailas Shinde (वय 28, रा नेताजीनगर, वानवडी – Netaji Nagar, Wanwadi) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरु होता.

याबाबत सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब (Meenakshi Friendship Club) नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत-हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. फियार्दी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फियार्दी यांची श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातील 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक (Fraud Case) करण्यात आली आहे.

 

शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला आहे. शिंदे हिच्या मार्फत हा सर्व कट रचणार्‍या मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake),
सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule), व. पो. नि. डी. एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता माळी (Police Inspector Sangeeta Mali),
उपनिरीक्षक अमोल वाघमारे (PSI Amol Waghmare),
पोलीस अंमलदार राहुल हंडाळ, अंकिता राघो, शुभांगी मालुसरे व निलेश लांडगे यांनी ही कारवाई केली.
सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

Web Title :- Pune Cyber Police | Deepali Kailas Shinde arrested by Pune Cyber Police The lure of money from having Physical Relation with high profile women Fraud of Rs 60 lakh 76 year old businessman

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | एसटी कामगार संपाबाबत पडळकरांचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हा सरकारचा सुनियोजित कट’

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts