IMPIMP

Gopichand Padalkar | एसटी कामगार संपाबाबत पडळकरांचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘हा सरकारचा सुनियोजित कट’

by nagesh
Gopichand Padalkar | 'Merge Uddhav Thackeray-Nationalists and..' Padalkar said the sign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gopichand Padalkar | मागील अनेक दिवसांपासून एसटीचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांचा राज्यभर संप (ST Workers Strike) सुरु आहे. यामुळे प्रवाशांना अधिक फटका बसला. काही दिवसांपुर्वी राज्य शासनाने (Maharashtra Government) एसटी कामगारांना वेतनवाढ केली. तसेच कामगारांच्या काही मागण्या देखील पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला. पण कामगार मात्र महामंडळाचे (MSRTC) विलिनीकरण करा या मागणीवर ठाम आहेत. यानंतर आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) घणाघाती आरोप केला आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, ”एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्यात वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट सरकार रचत आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असं आवाहन करायचं. आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतो, तेव्हा त्याच्या हातात चार्जशीट द्यायचं. पन्नास लाखांचं, एक कोटीचं नुकसान झालंय असं सांगून त्यांना नोटीस द्यायची असं सरकार करत आहे.”

पुढे पडळकर म्हणाले की, “सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या बाबत समितीनं सरकारकडे अहवाल दिला.
आता सरकार पुन्हा आठवड्याभराची मुदत मागतेय. म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला कशी नवी भरती काढता येईल,
म्हणजे त्यात आपल्याला टक्केवारी घेता येईल, मोठा घोटाळा करता येईल,
एसटीच्या भरतीत मोठा घोटाळा करता येईल हा प्लॅन सरकारचा दिसतोय,” असा आरोपही त्यांनी केला आहे.

Web Title :- Gopichand Padalkar | bjp leader and mla gopichand padalkar slams maharashtra uddhav thackeray government on st workers strike MSRTC

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

Related Posts