IMPIMP

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

by nagesh
Period Cramps | home remedies to relieve period pain how to get rid of menstrual cramps

सरकारसत्ता ऑनलाइन – मासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते (Women Health). प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जावे लागते. काहींना ते हलके दुखणे असते तर काहींना ते असह्य असते. ही वेदना (Period Cramps) संपूर्ण शरीरासाठी समस्या बनते. आज आम्ही अशाच काही उपायांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या वेदनांमध्ये मदत करू शकतात (How To Get Rid Of Menstrual Cramps).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. हलका शेक घ्या (Warm Compress Lightly) –
काहीवेळा पीरियड क्रॅम्प्समध्ये (Period Cramps) हलका शेक घेणे फायदेशीर ठरते. यासाठी, तुम्ही पोटाच्या खालच्या भागात हिटिंग पॅड किंवा शेक घण्याची बाटली ठेवा आणि आराम करा (Home Remedies To Relieve Period Pain).

 

2. हायड्रेटेड रहा (Stay Hydrated) –
मासिक पाळीदरम्यान शरीर हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणी प्या. असे केल्याने क्रॅम्पसह ब्लोटिंग, अपचन यांसारख्या समस्याही टळतात.

 

3. हलका व्यायाम (Light Exercise) –
डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम किंवा योगासने करू शकता. थोडे चालणे तुम्हाला सक्रिय ठेवेल आणि क्रॅम्पपासून आराम देईल.

4. चरबीयुक्त अन्न टाळा (Avoid Fatty Food) –
चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स, जंक फूड, चिप्स, अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळे क्रॅम्प्स वाढतात, त्यांच्यापासून दूर राहा. कमी चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या.

 

5. हिंग, ओवा आणि काळे मीठ (Asafoetida, Ajwain And Black Salt) –
हिंग, ओवा आणि काळे मीठ एका चमच्यात घेऊन कोमट पाण्यासोबत खावे. यामुळे वेदनांमध्ये लवकर आराम मिळू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

6. भरपूर झोप घ्या (Get Plenty Sleep) –
या दरम्यान, तणाव टाळण्याचा प्रयत्न करा आणि सुमारे 7-8 तास पुरेशी झोप घ्या. यामुळे क्रॅम्पपासून आराम मिळू शकतो.

 

7. हर्बल टी (Herbal Tea) –
मासिक पाळीच्या काळात आंबट आणि थंड पदार्थांचे सेवन करू नये. अशावेळी हर्बल टी हा एक उत्तम पर्याय आहे. आले, वेलची, काळी मिरी वगैरे घालून दुधाशिवाय चहा बनवू शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Period Cramps | home remedies to relieve period pain how to get rid of menstrual cramps

 

हे देखील वाचा :

Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

 

Related Posts