IMPIMP

Personal Finance | Fixed Deposit केल्यानंतर व्याजासह मिळतात हे 5 फायदे, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPersonal Finance | भारतात फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे अजूनही गुंतवणुकीचे उत्तम (Good Investment) साधन मानले जाते. या गुंतवणुकीत जोखीम कमी असते. व्याज देखील मिळते. मात्र, जास्त रिटर्नसाठी (High Return), बरेच लोक एफडी घेण्याऐवजी म्युच्युअल फंड (Mutual Funds) किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. (Personal Finance)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मात्र, जर तुम्हाला तुमच्या पैशांवर गॅरंटीसह रिटर्न (Guaranteed Return) हवा असेल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये फक्त व्याज मिळत नाही तर एकत्र अनेक फायदे आहेत. तुम्ही एफडीवर कर्ज (Loan On Fixed Deposits) किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft) घेऊ शकता. यामध्ये विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. (Personal Finance)

 

एफडीचे फायदे जाणून घ्या…

1. कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा (Loan Or Overdraft Facility)

अनेक बँका एफडीच्या आधारावर ओव्हरड्राफ्ट सुविधाही देतात. एफडी ही गॅरंटी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर कर्जाची रक्कम तुमच्या एफडीद्वारे कव्हर केली जाईल. तुम्ही इतर कोणत्याही गुंतवणुकीशी एफडीची तुलना करत असाल तरी हे देखील लक्षात ठेवा की तुम्हाला एफडीवर कर्ज मिळू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. विमा संरक्षण (Insurance Protection)

तुम्ही कोणत्याही बँकेत एफडी केली असेल, तर तुम्हाला त्यावर डिपॉझिट इन्श्युरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे विमा संरक्षण मिळते. जर तुमची बँक डिफॉल्ट झाली किंवा दिवाळखोर झाली, तर तुम्हाला या विमा संरक्षण अंतर्गत रु. 5 लाखांपर्यंत मिळतील.

यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असेल. याचा अर्थ तुम्हाला गॅरंटी नक्कीच मिळेल. 5 लाखांपर्यंत पैसे परत मिळण्याची हमी असेल.

 

3. मोफत जीवन विम्याचे फायदे (Benefits Of Free Life Insurance)

अशा अनेक बँका आहेत ज्या एफडी केल्यानंतर मोफत जीवन विम्याचा अतिरिक्त लाभ देतात.
बँका अशा ऑफर देतात जेणेकरून त्या अधिकाधिक लोकांना एफडीकडे आकर्षित करू शकतील.
या अंतर्गत बँका त्यांच्या ग्राहकांना एफडी रकमेच्या समतुल्य जीवन विमा देतात. यामध्ये वयोमर्यादा देखील आहे. (Personal Finance)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. मिळतील कराचे फायदे (Get Tax Benefits)
तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी एफडी केल्यास, तुम्ही प्राप्तीकर कायदा,
1961 च्या कलम 80 सी अंतर्गत त्यावर कर सूट मागू शकता. या अंतर्गत तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट घेऊ शकता.

मात्र, जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीची एफडी केली तर तुम्हाला कर भरावा लागेल.
सर्व बँकांकडून वर्षभरात मिळणारे व्याज 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही कर भरावा लागेल.

 

5. गॅरंटीसह रिटर्न
एफडीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्हाला खात्रीशीर रिटर्न मिळतो.
याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष किंवा कितीही वर्षांसाठी एफडी करत असाल तर यामध्ये माहीत असते की तुम्हाला मॅच्युरिटीवर किती पैसे मिळणार आहे. कारण एफडी फिक्स्ड रिटर्न देते.

तर, म्युच्युअल फंड, NPS, ELLS यांसारख्या गुंतवणुकीतील रिटर्न दरवर्षी बदलतो आणि शेअर बाजाराच्या वाटचालीवर अवलंबून असतो.

 

Web Title :- Personal Finance | five benefits of fixed deposit know the reasons to invest in fixed deposits apart from interest rate

 

हे देखील वाचा :

Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान?

Post office Scheme | दरमहिना जमा करा 5 हजार रुपये, मॅच्युरिटीवर मिळेल 8 लाख रुपयांचा फंड; जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

 

Related Posts