IMPIMP

Post office Scheme | दरमहिना जमा करा 5 हजार रुपये, मॅच्युरिटीवर मिळेल 8 लाख रुपयांचा फंड; जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

by nagesh
Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस विविध योजना (Post office Scheme) ऑफर करते. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरते. कारण पोस्ट ऑफिसचे धोरण अशा प्रकारे तयार केले जाते की ठराविक अंतरानंतर मोठी रक्कम मिळू शकते. (Post office Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिसमधील आवर्ती ठेव Recurring Deposit (RD) खाते लहान बचत गुंतवणुकीसाठी एक लोकप्रिय पर्याय आहे. कारण ही एक लहान बचत योजना आहे, त्यामुळे तुम्ही दररोज थोडी थोडी रक्कम जमा करून त्यात गुंतवणूक करू शकता. विशेष बाब म्हणजे या योजनेत किमान 100 रुपयेही जमा करता येतात.

योजनेतील रिटर्न 5.8 टक्के व्याजदराने दिला जातो. हे खाते 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या नावानेही उघडता येते.

 

पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक कशी करावी –

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत कोणतीही प्रौढ व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत, 100 रुपयांच्या अनेक रकमांमध्ये गुंतवणूक केली जाते जी 6 महिने ते 60 महिन्यांपर्यंत करता येते. (Post office Scheme)

त्याच वेळी, या योजनेत केलेली गुंतवणूक 5 – 5 वर्षांसाठी दोनदा पुढे नेली जाऊ शकते. याशिवाय, पोस्ट ऑफिस आरडीवर कर्ज देण्याची सुविधा देखील प्रदान करते. ज्यामध्ये ग्राहकाला जमा केलेल्या रकमेवर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कशी मिळेल 8 लाखांपेक्षा जास्त रक्कम –

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये (Post Office Recurring Deposit), जर तुम्ही 10 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपये जमा केले,
तर तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये असेल, ज्यावर 5.8 टक्के व्याजदराने तुम्हाला 2,13,237 लाख रुपये व्याज मिळेल.
अशा स्थितीत, मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला एकूण 8,13,237 लाख रुपये मिळतील.

 

Web Title :- Post office Scheme | post office deposit 5 thousand rupees every month on maturity you get a fund of 8 lakh rupees

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

Pune Crime | दुर्दैवी ! दौंड येथील तलावात बुडुन दोघा चुलत भावांसह तिघांचा मृत्यु

Pune Crime | पहाटे रिक्षाचालकाच्या नकाराने झालेल्या वादात दोघा तरुणांवर चाकूने वार; विश्रांतवाडीतील घटनेत रिक्षाचालकासह तिघांवर गुन्हा

 

Related Posts