IMPIMP

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

by omkar
Petrol

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – लागोपाठ महाग होत असलेल्या पेट्रोल-डिझेलचे (Petrol ) दर सध्या शहरांमध्ये विक्रमी पातळीवर पोहचले आहे. मुंबईत पेट्रोल (petrol) 102 रुपये लीटरच्या जवळ पोहचले आहे. तर काही शहरात हा आकडा सुद्धा पार केला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवसानंतर पुन्हा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात सुद्धा 25 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सोमवारी पेट्रोलचा भाव 24-28 पैसे प्रति लीटर आणि डिझेलचा भाव 26-28 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढवला होता. मे महिन्यापासून इंधनाच्या किंमती सतत वाढत आहेत. मागील 21 दिवसात पेट्रोल 4.99 पैसे प्रति लीटर महाग झाले आहेत. तर, डिझेलचे दर 5.44 रुपये प्रति लीटर वाढले आहेत.

पुणे

मंगळवारी एक दिवस दिलासा दिल्यानंतर तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात आज वाढ केली आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात आज  लिटरमागे २४ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलचा आता नवीन दर १०२.४२ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात तब्बल २६ पैशांनी लिटरमागे वाढ करण्यात आली आहे. आता डिझेलचा प्रति लिटर दर ९२.०८ रुपये झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोल आता १०५.११ रुपये लिटर झाला आहे.

प्रमुख शहरातील अनुक्रम पेट्रोल, डिझेलचे प्रति लीटर दर / रूपये

दिल्ली – 95.56 – 86.47
मुंबई – 101.76 – 93.85
कोलकाता – 95.52 – 89.32
चेन्नई – 96.94 – 91.15
जयपुर – 102.14 – 95.37
बेंगळुरु – 98.75 – 91.67
नोएडा – 92.91 – 86.95
भोपाळ – 103.71 – 95.05
श्रीगंगा नगर – 106.64 – 99.50
रिवा – 105.93 – 97.11

Also Read:

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

Pune Crime News : कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’ (VIDEO)

Ramdas Athawale | PM मोदींच्या निर्णयामुळे टीका करणाऱ्या महाविकास आघाडीचे तोंड बंद

4 तप ‘सत्तेच्या पडछायेत’ असणारा प्रशासक काळाच्या पडद्याआड ! माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

9 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, ग्रह-नक्षत्राची मिळेल पूर्ण साथ, इतरांसाठी असा आहे बुधवार

 

Related Posts