IMPIMP

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

by nagesh
Petrol-Diesel Prices Today | petrol diesel price today on 12 may 2022 check details

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Pune | जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने तेल कंपन्या दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ करीत आहेत. आज पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. ऑक्टोंबरच्या या ७ दिवसांपैकी सलग ४ दिवस भाववाढ करण्यात आली (Petrol Diesel Price Pune) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पेट्रोलच्या दरात आज लिटरमागे २९ पैशांची वाढ करण्यात आली आहे. बुधवारीही २८ पैशांची वाढ करण्यात आली होती. गुरुवारी पुण्यात पेट्रोलचा दर १०८.७६ रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात गेल्या दोन दिवसात लिटरमागे ७२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज डिझेलचे दर ९७.५४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही दोन दिवसात ५७ पैशांनी महागले आहे. गुरुवारी पॉवर पेट्रोलचा दर ११२.४४ रुपये लिटर झाला आहे.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील ही भाववाढ किती काळ सुरु राहणार,
याविषयी कोणीही निश्चित काही सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यवसायिकांना कोणताही निर्णय घेता येत नाही.
शहरातील सर्व फरसाण विक्रेते, मिठाईवाले यांच्याकडे प्रामुख्याने डिझेल भट्ट्या आहेत.
डिझेलच्या दरात दररोज होत असलेल्या दरवाढीमुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
मात्र, ही दरवाढ किती दिवस आणि किती होणार आहे,
याची काहीही खात्री नसल्याने आपल्या पदार्थांचे दर किती वाढवायचे, याचे गणित मांडणे त्यांना अवघड झाले आहे.

 

 

Web Title :- Petrol Diesel Price Pune

 

हे देखील वाचा :

Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार

ST Driver Suicide | एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

Maha Vikas Aghadi | लखीमपूर खेरी प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

 

Related Posts