IMPIMP

PF Interest Rate | जर 50,000 रुपये असेल सॅलरी तर PF वर व्याज कमी केल्याने होईल ‘इतके’ नुकसान; जाणून घ्या

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPF Interest Rate | कर्मचार्‍यांच्या भविष्याची हमी मानल्या जाणार्‍या पीएफ ठेवीवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय EPFO ने घेतला आहे. अशा स्थितीत, जर एखाद्या कर्मचार्‍याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल, तर त्याला एका वर्षात त्याच्या पीएफ ठेवीवर मिळणार्‍या व्याजाच्या रकमेत किती नुकसान होईल ते जाणून घेवूयात. सर्वप्रथम, हे जाणून घ्या की EPFO ने व्याजदर 8.5 वरून 8.1 टक्के केला आहे. (PF Interest Rate)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतका पीएफ होतो जमा
कर्मचार्‍याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता (डीए) जोडून आलेल्या रकमेच्या 12% रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. जर एखाद्या कर्मचार्‍याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल आणि त्याचा मूळ पगार + महागाई भत्ता मिळून दरमहा 20,000 रुपये असेल, तर त्याच्या पीएफ खात्यात कर्मचारी योगदान म्हणून दरमहा रुपये 2,400 जमा होतील.

 

एम्प्लॉयर जमा करतो इतके पैसे
पीएफ खात्यात (PF Account) कर्मचार्‍याच्या मालकाला म्हणजेच कंपनीलाही केवळ 12 टक्के योगदान द्यावे लागते.
परंतु यापैकी 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन फंड (ईपीएस फंड) मध्ये जाते आणि उर्वरित 3.67% रक्कम पीएफ खात्यात जाते.
त्यानुसार, जर एखाद्या कर्मचार्‍याचा पगार 50,000 रुपये असेल, तर नियोक्ता त्याच्या पीएफ खात्यात 734 रुपये जमा करेल. (PF Interest Rate)

 

 

उर्वरित 1,666 रुपये त्याच्या पेन्शन खात्यात गेले पाहिजेत.
परंतु कंपनी पेन्शन खात्यात दरमहा जास्तीत जास्त 1,250 रुपये जमा करू शकते.
त्यानुसार उर्वरित 416 रुपयांची रक्कमही कर्मचार्‍याच्या पीएफ फंडात जाईल.
यावर, कंपनीकडून दरमहा 1,150 रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा केले जातील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वर्षभरात जमा होईल एवढा पीएफ
जर तुमचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल, तर तुमच्या आणि तुमच्या कंपनीच्या योगदानासह दरमहा 3,550 रुपये तुमच्या पीएफ खात्यात जमा केले जातील.
अशा प्रकारे, एका वर्षात तुमच्या पीएफ खात्यात एकूण 42,600 रुपये जमा होतील.

जर एखाद्या कर्मचार्‍याचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह एकूण रक्कम 50,000 रुपये प्रति महिना असेल,
तर या संपूर्ण हिशोबानुसार, त्याचा वर्षभराचा पीएफ 1.29 लाख रुपये असेल.

 

व्याजातून मिळणारे उत्पन्न होईल खूप कमी
तुमचा पगार 50,000 असल्यास, गेल्या आर्थिक वर्ष 2020 – 21 मध्ये पीएफ वर उपलब्ध असलेल्या 8.5% व्याजदरानुसार, तुम्हाला तुमच्या एकूण पीएफ ठेवीवर 3,621 रुपये व्याजाचे उत्पन्न मिळाले असते.
आता EPFO ने 2021-22 साठी व्याजदर 8.1% पर्यंत कमी केला आहे.

अशा प्रकारे, आता तुमचे व्याज उत्पन्न 3,450.60 रुपये होईल.
अशा प्रकारे, तुमचे व्याज उत्पन्न एका वर्षात 170.40 रुपयांनी कमी होईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देशातील सुमारे 6 कोटी कर्मचार्‍यांना फटका
देशातील सुमारे 6 कोटी कर्मचार्‍यांच्या पीएफचे मॅनेजमेंट EPFO करते.
त्याची निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने शनिवारी पीएफ फंडावरील व्याजदर 8.1% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे 6 कोटी कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

 

Web Title :- PF Interest Rate | employee with rs 50000 salary have to face this much loss after pf interest rate reduction epfo

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘माझे प्रश्न कोणी बदलले हे…’; पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा !

Sleepiness After Lunch | दुपारच्या जेवणानंतर ताबडतोब झोप येते का? जाणून घ्या किती धोकादायक ठरू शकते ‘ही’ सवय

LIC Kanyadan Policy Fact Check | तुम्ही सुद्धा खरेदी केली का LIC ची ’कन्यादान’ पॉलिसी, जाणून घ्या सत्य अन्यथा बुडतील पैसे

 

Related Posts