IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 59 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 2600 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 59 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 23 लाख 67 हजार 388 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 78 हजार 823 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 46 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 607 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

सध्या शहरामध्ये 423 सक्रिय रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 214 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 209 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 4524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pimpri Corona | Number of active patients increases in Pimpri Chinchwad ! Diagnosis of 59 patients of Corona in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

Pune Corona | पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 171 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts