IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 161 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 161 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आज एकही ओमायक्रोन बाधित (Omacron) रुग्ण आढळून आलेला नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 161 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 534 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 457 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 52 हजार 086 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona Update)

 

शहरामध्ये सध्या 1567 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 2 हजार 717 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 33 लाख 66 हजार 740 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | Diagnosis of 161 corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 45 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात आज 1165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sanjay Raut | किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी विचारले ‘हे’ 6 प्रश्न

 

Related Posts