IMPIMP

PM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर आधार देईल प्रधानमंत्री वय वंदना योजना, दर महिना मिळेल 9,250 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

by nagesh
Employee Pension Scheme | employee pension scheme epfo pf account how long contribution will have to be made in eps

नवी दिल्ली – वृत्त संस्थाPM Vaya Vandana Yojana | निवृत्तीनंतर रोजच्या खर्चासाठी लोकांना समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठीच केंद्र सरकारची (Central Government) एक योजना असून यामध्ये तुम्हाला दरमहिना 9250 रुपयांची पेन्शन मिळते. ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीनंतर आपले जीवन सहजपणे जगू शकता. या योजनेचे नावप्रधानमंत्री वय वंदना योजना (PM Vaya Vandana Yojana) आहे. या योजने बाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कुठे करावी लागेल गुंतवणूक

प्रधानमंत्री वय वंदना योजना (Prime Minister Vaya Vandana Yojana) ही सरकारी पेन्शन योजना आहे. जी भारतीय आयुर्विमा महामंडळ चालवत
आहे. ही योजना 4 मे 2017 रोजी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली. या योजनेत एकरकमी किंवा दर महिन्याला गुंतवणूक करण्यास सूट आहे.

 

 

किती मिळते व्याज

केंद्र सरकारच्या या योजनेत वार्षिक 7.40 टक्के दराने व्याज दिले जाते. ज्यामध्ये दरमहा एकरकमी जमा करून निश्चित पेन्शन मिळू शकते. या योजनेत एकरकमी गुंतवणुकीची मर्यादा 7.5 लाख रुपये होती. जी आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे.

 

 

दर महिना मिळेल 9250 रुपयांची पेन्शन

पीएम वय वंदना योजनेअंतर्गत जास्तीत जास्त मासिक पेन्शनची रक्कम 9250 रुपये आहे. तुम्ही 27,750 रुपये अर्धवार्षिक पेन्शन म्हणून घेऊ शकता आणि तुम्हाला वार्षिक पेन्शन हवी असेल तर तुम्हाला 1.11 लाख रुपये मिळतील. पण यासाठी तुम्हाला PMVVS स्कीममध्ये 15 लाख रुपये जमा करावे लागतील. (PM Vaya Vandana Yojana)

या योजनेची मुदत 10 वर्षे आहे. जर पती-पत्नी या योजनेत एकत्र गुंतवणूक करत असतील आणि गुंतवणुकीची रक्कम 30 लाख रुपये असेल, तर दरमहा 18,500 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोण करू शकतात गुंतवणूक

60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक पीएम वय वंदना योजना घेऊ शकतो.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही.
दुसरीकडे, योजना सुरू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण रक्कम परत मिळते.
याशिवाय या योजनेत तीन वर्षांनी कर्ज घेण्याचीही सुविधा आहे.

 

 

Web Title : PM Vaya Vandana Yojana | after retirement sahara become prime minister vaya vandana yojana get pension of rs 9 250 every month

 

हे देखील वाचा :

Women Health | चाळीशीनंतर महिलांनी रोज करावे अंड्याचे सेवन, कधीही होणार नाही ‘ही’ समस्या

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात पुढील आठवडा थंडीचा; ग्रामीण भागांत दिसू लागले स्वेटर, शाली, गमछे

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

 

Related Posts