IMPIMP

Covid Vaccines Childerns | आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

by nagesh
Pune Municipal Corporation-PMC | corona preventive dose in 68 hospitals from pune municipal corporation pmc

सरकारसत्ता ऑनलाइन – Covid Vaccines Childerns | कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Preventive Vaccination) मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. काही दिवसापासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लस कधी मिळणार असे वारंवार विचारले जात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) या (15 ते 18 वर्ष) वयोगटातील मुलांना लस (Covid Vaccines Childerns) देण्याचा निर्णय घेतल्याचे शनिवारी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. त्यानुसार आजपासून या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लस घेण्यासाठी मुलांची ‘कोविन’वर (CoWIN App) नोंदणी करावी लागणार असल्याचे ‘कोविन’चे प्रमुख डॉ. आर एस शर्मा (Dr. R. S. Sharma) यांनी सांगितले आहे. नोंदणीसाठी मुलांना ओळखीचा पुरावा म्हणून 10 वीचे ओळखपत्र देखील ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड (Aadhaar card) किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसण्याची शक्यता आहे. CoWIN प्लॅटफॉर्मवर मुलांची नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा. (Covid Vaccines Childerns)

 

 

कशी कराल नोंदणी ?

  • सुरुवातीला CoWIN App वर जावे. तेथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
  • लॉंग इन झाल्यावर तेथे दिलेल्या आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडावा.
  • आपण जो आयडी निवडणार आहे त्याचा नंबर, नाव, जेंडर आणि जन्मतारीख टाकावी.
  • मेंबर अँड झाल्यानंतर, तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी समोर दिसेल.
  • केंद्र निवडल्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. त्यानंतर आपण केंद्रावर जाऊन लसीकरण करू शकतो.
  • नोंदणी केल्यानंतर संदर्भ आयडी आणि सिक्रेट कोड देण्यात येईल. त्यानंतर संदर्भ आयडी आणि सिक्रेट कोड लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर तेथे द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, जे लॉगिन तयार केले आहे त्यामध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकतो.

 

 

 

30 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांचे लसीकरण –

कोरोनाचा संसर्ग (Corona Virus) जगभरात आहे. त्यामुळे अनेक देशांनी यापूर्वीच मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. जवळपास जगातील 30 हून देशात मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. क्युबामध्ये, 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दुसरा आणि प्री-कॉशन डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर आवश्यक –

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बूस्टर डोसची (Booster Dose) मागणी होऊ लागली आहे. मात्र हा बूस्टर डोस कधी घ्यायचा याबाबत अजून संभ्रम आहे. या संदर्भात डॉ. आर.एस. शर्मा (Dr. R.S. Sharma) यांनी सांगितले की, दुसरा डोस घेतल्यानंतर बूस्टर किंवा प्री-कॉशन डोसमध्ये (Precaution Dose) 9 महिन्याचे अंतर आवश्यक आहे. म्हणजे, जर तुमचे वय 60 वर्षे असेल आणि तुम्ही दोन्ही डोस घेतले असतील तर दुसरा डोस आणि तुम्ही नोंदणी करत असलेल्या दिवसातील फरक 9 महिन्यांपेक्षा जास्त म्हणजे 39 आठवडे असणे आवश्यक आहे. तेवढा कालावधी पूर्ण झाला असले तरच या डोससाठी तुम्ही पात्र असणार. 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्री-कॉशन डोस दिला जाणार आहे.

 

 

Web Title : Covid Vaccines Childerns | children covid vaccination steps process for registration process

 

हे देखील वाचा :

ATM Withdrawal Charges Rules | आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार जास्त चार्ज ! बँक लॉकर आणि PF शी संबंधित नियमही बदलले; जाणून घ्या

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने अवघ्या 9 महिन्यात गुंतवणुकदारांना बनवलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

IPS Ankita Sharma | ही आयपीएस महिला प्रसिध्दीच्या झोतात… हातामध्ये AK-47 घेऊन नक्षलवाद्यांच्या विरूध्द करते ऑपरेशन

 

Related Posts