IMPIMP

PMC Building Construction Development | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता ! पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा पन्नास टक्केच उत्पन्न

by Team Deccan Express
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMC Building Construction Development | कोरोनामधील लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाला (PMC Construction Department) २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२१ – २२ या आर्थिक वर्षात २ हजार ८७ कोटी इतके ऐतिहासिक उत्पन्न मिळाले. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या (२०२२ – २३) पहिल्या दोन महिन्यांत पुन्हा उत्पन्नाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा ५० टक्के उत्पन्न घटले असून हाच ट्रेंड राहील्यास अंदाजापेक्षा कमी उत्पन्न मिळेल, असे दिसून येत आहे. (PMC Building Construction Development)

 

महापालिकेच्या बांधकाम विभागाला मागील आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून २ हजार ८७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. विशेष असे की महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये १ हजार १८५ कोटी रुपयेच अपेक्षित धरण्यात आले होते. त्याअगोदरचे वर्ष कोरोनामध्ये गेल्याने सर्वच बाजारपेठ ठप्प होती. तरीही २०२० – २१ मध्ये पहिली लाट ओसरल्यानंतर उत्पन्नाने बर्‍यापैकी हात दिल्याने बांधकाम विभागाला ४८४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०२१ – २२ मध्ये सर्व व्यवहार पुर्वपदावर येत असताना राज्य शासनानेही सर्वाधीक रोजगार असलेल्या बांधकाम सेक्टरला गती देण्यासाठी प्रिमियममध्ये सवलत तसेच मुद्रांक शुल्कामध्येही डिसेंबर २०२१ पर्यंत सवलत दिली होती. याचा लाभ बांधकाम व्यावसायीक आणि ग्राहकांनीही घेतला. यामुळेच महापालिकेला मागील आर्थिक वर्षात अंदाजापेक्षा १७६ टक्के अधिकचे उत्पन्न मिळाले. (PMC Building Construction Development)

 

चालू आर्थिक वर्षासाठी बांधकाम विभागाने १ हजार ४०० कोटी रुपये अंदाजित उत्पन्न धरले आहे.
अर्थात दरमहा ११६ कोटी ६८ लाख रुपये उत्पन्नाचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.
मात्र, यंदा एप्रिलमध्ये फक्त ६७ कोटी ९६ लाख रुपये तर २५ मे पर्यंत ४९ कोटी ३० लाख रुपये असे ११७ कोटी २७ लाख उत्पन्न मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत अनुक्रमे ८८ कोटी ८५ लाख रुपये आणि ९९ कोटी १९ लाख रुपये असे १८८ कोटी ४ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा आतापर्यंत फक्त ११२ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. बांधकाम परवानगीचा हाच ट्रेंड कायम राहील्यास वर्षाअखेरीस बांधकाम विभागाकडून १ हजार २०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल. मागीलवर्षीच्या तुलनेत ८०० कोटी रुपयांनी उत्पन्न घटण्याची शक्यता अधिकारी सूत्रांनी वर्तविली आहे.

 

Web Title :- PMC Building Construction Development | Revenue of PMC Building development construction department is likely to decline this year Fifty per cent higher than expected in the first two months

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts