IMPIMP

PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘सुसंस्कृत राष्ट्रासाठी मुल्य शिक्षणाची गरज’ – महापालिका उपायुक्त आशा राऊत

by nagesh
PMC Deputy Commissioner Asha Raut | 'Need for value education for a civilized nation' - Municipal Corporation Deputy Commissioner Asha Raut

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘आजच्या युवकामध्ये भावनिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, वैज्ञानिक व सुसंस्कृत विकास घडवून आणण्यासाठी मुल्य शिक्षणाचा खुप मोठा वाटा आहे. त्यामुळे जिज्ञासा, संशोधक, बुध्दी, मनाची व ह्रदयाची शुध्दता, मनाचा कणखरपणा, सर्व समावेशकता, समाजाबाबत आपुलकी निर्माण व्हायला मदत होते. तसेच, सशक्त आणि सुसंस्कृत मुल्य संवर्धित राष्ट्रासाठी मुल्य शिक्षण कार्यशाळा सर्व शैक्षणिक संस्थामधून घेण्याची नितांत गरज असल्याचे मत महापालिका उपायुक्त आशा राऊत (PMC Deputy Commissioner Asha Raut) यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

एआयएसएसएमएसचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे विद्यापीठ स्तरीय मुल्य शिक्षण- व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊत (PMC Deputy Commissioner Asha Raut), संस्थेचे सहसचिव सुरेश शिंदे (Suresh Shinde), प्राचार्य डाॅ. डी.एस. बोरमणे (Dr. D.S.Bormane), डॉ नाना शेजवळ (Dr. Nana Shejwal), प्रा. व्ही आर पाटील (V.R. Patil), डाॅ परमानंद डांगे (Dr. Parmanand Dange)आदी उपस्थित होते.

 

पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक मितेश घट्टे म्हणाले. ”मानवी जीवनामध्ये व्यक्तिमत्व व जीवन मुल्य विकसित करण्यासाठी मुल्य शिक्षणाचा खुप मोठा वाटा आहे. निसर्गापुढे माणूस अतिशय क्षुद्र आहे. हे कोरोनासारख्या जागतिक आपत्तीत दिसून आले. निसर्ग हवा पाणी प्रकाश देताना कुठलाही जात धर्म आणि भाषिक भेदभाव करत नाही. पण माणूस करतो. आपण आपल्या राष्ट्रपुरुषामध्ये आणि भारत देशाच्या स्वातंत्र्यांसाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना जाती धर्माच्या साखळदंडात जोखडून ठेवले आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुढे ते म्हणाले, ”एकविसाव्या शचताच तंत्रज्ञानाच्या युगात द्रोणाचार्य व एकलव्य यांचा आजही गुरु शिष्याचा परस्पर संबंध आहे.
भेदाभेद अमंगळ यांची जाणीव करुन देण्यासाठी आणि जाती धर्म आणि पंथ यांच्या भिंती पाडून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी
अशा मुल्य शिक्षण कार्यशाळेची नितांत गरज आहे.”

 

Web Title :- PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘Need for value education for a civilized nation’ – Municipal Corporation Deputy Commissioner Asha Raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांवर FIR

ST Workers Strike | अल्टिमेटमवरुन एसटी कामगारांचं अजित पवारांना उत्तर; म्हणाले – ‘हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे’

 

Related Posts