IMPIMP

ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

by nagesh
Maharashtra Karnataka Border Issue | 660 rounds of ST running Kolhapur Karnataka cancelled

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. अनेक घडामोडीनंतर काही एसटी कामगार (MSRTC Worker) कामावर दाखल झाले. मात्र काही कामगार अजुनही संपावर ठाम आहेत. दरम्यान आजच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कामगारांना इशारा दिला आहे. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही कामगारांना इशारा दिला. दरम्यान, आता एक मोठी माहिती मिळत आहे. एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात (MSRTC) मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Workers Strike) उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे बारा हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. (ST Workers Strike)

 

दरम्यान, ”एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा आज संपत आहे. आज जे कर्मचारी हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. त्याचबरोबर11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचं,” अनिल परब म्हणाले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | MSRTC st strike mega recruitment in st corporation

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांवर FIR

ST Workers Strike | अल्टिमेटमवरुन एसटी कामगारांचं अजित पवारांना उत्तर; म्हणाले – ‘हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे’

Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित

 

Related Posts