IMPIMP

ST Workers Strike | अल्टिमेटमवरुन एसटी कामगारांचं अजित पवारांना उत्तर; म्हणाले – ‘हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे’

by nagesh
ST Workers Strike | msrtc st workers protest workers says ajit pawar dont know the dates and time given by court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | संपावर असणाऱ्या राज्यातील एसटी कामगारांचा (ST Workers Strike) मुदतीचा आज
अंतिम दिवस आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) कामगारांना कामावर हजर राहण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. पण
काही एसटी कामगार (MSRTC Worker) संपावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज पुन्हा एकदा संपकरी एसटी कामगारांना इशारा दिला आहे. यानंतर आझाद मैदानावरील आंदोलनकर्त्या एसटी कामगारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”आताचे मंत्रिमंडळ विदूषकांचे मंत्रिमंडळ झालेले आहे. अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, 31 तारखेपर्यंत कामावर न परतल्यास कठोर कारवाई करू अशा धमक्या देत होते. तितक्यात एका पत्रकाराने त्यांना, उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 5 तारखेपर्यंत मूभा दिलेली आहे, यावर तुम्हाला काय म्हणायचंय असे विचारले असता अजित पवार गोंधळून गेले. मग म्हणाले, 5 एप्रिलपर्यंत माझा अल्टिमेटम वाढवतो. आज या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला न्यायालयाने किती अल्टिमेटम दिलेलं आहे याची जर यांना माहिती नसेल तर ते काय मंत्रिमंडळ चालवतात, काय महाराष्ट्र चालवतात ?,” असा संतप्त सवाल एसटी कामगारांनी (ST Workers Strike) उपस्थित केला आहे.

दरम्यान, 31 तारखेपर्यंत सगळ्यांना संधी द्या असं सांगण्यात आलं होतं. उद्यापासून कठोर निर्णय घेतला जाणार आहे अशी शक्यता आहे.
उद्या वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलं आहे त्यांच्या जागी नवीन भरती होऊ शकते,” असा इशारा अजित पवारांनी दिला.
तसेच, “समितीचा जो रिपोर्ट आला त्यातही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पगारही पूर्वीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढवले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने दिलेली मुदत संपली तर कठोर कारवाईचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो असं देखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- ST Workers Strike | msrtc st workers protest workers says ajit pawar dont know the dates and time given by court

हे देखील वाचा :

Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित

Malaika Arora Bralette Photo | नियॉन कलरची ब्रा घालून रस्तावर फिरताना दिसली मलाइका अरोरा, फोटो झाले व्हायरल

Related Posts