IMPIMP

Pune Crime | फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | हॉटेलमध्ये पार्सल घेत असताना हॉटेल मालकासोबत झालेल्या वादातून एका युवकाच्या डोक्यात स्टिलचा रॉड (Steel Rod) मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना रविवारी (दि.27) घडली होती. ही घटना पुण्यातील (Pune Crime) आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील प्यासा हॉटेलमध्ये (Pyasa Hotel) घडली होती. या गुन्ह्यातील फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जय पांडुरंग निकम Jai Pandurang Nikam (वय-21), प्रशांत प्रकाश जाधव Prashant Prakash Jadhav (वय-21 दोघे रा. जांभुळवाडी रोड, दत्तनगर, कात्रज-Katraj) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी अमोल शंकर देवगिरीकर Amol Shankar Devagirikar (वय-31 रा. चरवड वस्ती, वडगाव बु) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC 307,504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमोल देवगीरीकर हे आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये पार्सल घेत होते. त्यावेळी हॉटेलचे मालक जय निकम, प्रशांत जाधव यांच्यासोबत शाब्दीक वाद झाले. याच वादातून आरोपींनी अमोल यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने स्टिलचा रॉड डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेले.

 

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) व हर्षल शिंदे (Hershal Shinde) यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav), पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde), पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार,
हर्षल शिंदे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Two absconding accused arrested by Bharati vidyapeeth police

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यावर छापा, 8 जणांवर FIR

ST Workers Strike | अल्टिमेटमवरुन एसटी कामगारांचं अजित पवारांना उत्तर; म्हणाले – ‘हे विदूषकांचे मंत्रिमंडळ आहे’

Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

 

Related Posts