IMPIMP

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

by nagesh
Pune Crime | Bike rider killed in collision with PMPL bus, FIR against bus driver

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMPML Punyadasham Bus Service | शहराच्या मध्यवर्ती भागातील खाजगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘पुण्यदशम’ ही बससेवा मोफतच (Punyadasham Bus Service Free) करण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएलने विचार सुरू केला आहे. यासाठी दरवर्षी साधारण साडेसात कोटी रुपये खर्च येणार असून येत्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा (PMPML CMD Laxminarayan Mishra) यांनी दिली. (PMPML Punyadasham Bus Service)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएमपीएमएलचा नुकताच वर्धापन दिन झाला. यानिमित्ताने पीएमपीएमएल प्रशासनाने पीएमपीएमएल सुविधा अधिक लोकाभिमुख करण्यासोबतच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यासाठी ‘बस डे’ (PMPML Bus Day) अंतर्गत काही प्रयोगही केले.
यामध्ये एक दिवस १८३० बसेस रस्त्यावर उतरविल्या. यातून पीएमपीला एका दिवसांत १ कोटी ६५ लाख रुपये उत्पन्न मिळाले तसेच प्रवाशांची संख्या देखिल वाढली.
एक दिवस ५ आणि १० रुपयांत प्रवासाची योजनाही राबविली.
त्यादिवशी सर्वच विशेषत: महिला प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा वाढल्याचे निदर्शनास आले. परंतू तोटा अधिकच वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले.
तर एक दिवस शहराच्या मध्यवर्ती भागातील पुण्यदशम या मिनिबस सर्व्हिस मोफत ठेवली होती.
त्यादिवशी प्रवाशी संख्या नेहमीपेक्षा वाढलीच तसे २ लाख रुपये तोटा झाला. (PMPML Punyadasham Bus Service)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मध्यवर्ती भागातील अरुंद रस्ते तसेच बाजारपेठेमुळे होणार्‍या गर्दीत खाजगी वाहनांचा वापर कमी करून अधिकाअधिक नागरिकांनी बसचा वापर करावा यासाठी पुण्यदशम बससेवा सुरू करण्यात आली आहे.
ही बससेवा मोफत ठेवल्यास प्रत्येक दिवशी २ लाख तोटा होतो. ही बससेवा वर्षभर सुरू ठेवल्यास साडेसात कोटी रुपये खर्च येणार आहे.
मध्यवर्ती तसेच मेट्रो मार्गांना कनेक्टेड ही सेवा मोफत सुरू केल्यास शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीची कोंडी बर्‍याच अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
याचा विचार करून मध्यवर्ती भागासह शहराच्या गर्दीच्या उपनगरातही मर्यादीत स्वरूपात मोफत सुविधा देता येउ शकेल ?
याचाही अभ्यास सुरू आहे.
येत्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांनी नमुद केले.

 

 

Web Title :-  PMPML Punyadasham Bus Service | Punyadasham bus service will be free! Positive role of IAS Laxminarayan Mishra Managing Director PMPML

 

हे देखील वाचा :

PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Ajit Pawar on Amol Mitkari Statement | अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले…

Prakash Ambedkar on Raj Thackeray | औरंगाबाद संवेदनशील शहर ! ‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये’ – प्रकाश आंबेडकर

 

Related Posts